JOIN US
मराठी बातम्या / मनी / नवीन वर्षात शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 929 तर निफ्टीत 271 अंकांची वाढ

नवीन वर्षात शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 929 तर निफ्टीत 271 अंकांची वाढ

सेन्सेक्स तेजीसह उघडला आणि मजबूत होत गेला. अखेर सेन्सेक्स 929.40 अंकांच्या मजबूतीसह 59,183.22 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 271.65 अंकांच्या वाढीसह 17,625.70 वर बंद झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात कोविडशी संबंधित निर्बंध असतानाही देशांतर्गत शेअर बाजारात चांगली मजबूती दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी आणि जागतिक बाजारातून चांगले संकेत न मिळाल्यानेही निर्देशांकातील वाढ रोखण्यात अपयश आले. विश्लेषक म्हणाले की काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्बंध लादले असले तरी त्याचा आर्थिक हालचालींवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार नाही. काही क्षेत्रे वगळता, इंडिया इंकच्या कमाईवर होणारा परिणाम कमी असेल, असेही ते म्हणाले. निफ्टी 271 अंकांनी वधारला सेन्सेक्स तेजीसह उघडला आणि मजबूत होत गेला. अखेर सेन्सेक्स 929.40 अंकांच्या मजबूतीसह 59,183.22 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 271.65 अंकांच्या वाढीसह 17,625.70 वर बंद झाला. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे सोमवारी ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलंड आणि थायलंडमधील वित्तीय बाजार बंद राहिले. Arihant Capital शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात शेअरमध्ये 160 टक्के वाढ निफ्टीची17,700 पातळी महत्त्वाची आहे एंजल वनचे सुमीत चव्हाण म्हणाले, निफ्टी 17,400 वरील टिकाऊ क्लोजिंग होण्याची प्रतीक्षा करू शकते, जे डेली टाइम फ्रेम चार्टवरील ‘डाऊनवर्ड स्लोपिंग चॅनल’चे हायर एंड आहे. यानंतर 17,550-17,700 च्या आसपास नजर ठेवावी लागेल. दुसरीकडे, 17,000-16,800 हे महत्त्वाचे सपोर्ट लेव्हल म्हणून पाहिले जाऊ शकतात. बऱ्याच दिवसांनी ऑटो क्षेत्रात तेजीत आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Metal, Financial, Realty आणि Auto शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. निफ्टीचा मेटल इंडेक्स आज 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, ऑटो इंडेक्स 1.6 टक्के वाढण्यात यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, निफ्टी फायनान्स इंडेक्स 2.4 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. Credit Card चा वापर करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठं नुकसान एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय मजबूत बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) 3.49 टक्क्यांनी वाढून 16,963 वर बंद झाला. दुसरीकडे, अॅक्सिस बँक (Axis Bank) 2.41 टक्क्यांनी वाढून 694.90 वर पोहोचली. एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) 2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. वाहनांच्या चांगल्या विक्रीमुळे मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये 1.25 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, विप्रो (Wipro), एशियन पेंट्स (Asian Paints) आणि टेक महिंद्रा (Tech Mahindra) 1 टक्क्यांहून अधिक वाढले. एनटीपीसी (NTPC), टीसीएस (TCS), पॉवर ग्रिड (PowerGrid), एचसीएल टेक (HCL Tech) आणि इन्फोसिसचे (Infosys) शेअरही सुमारे 1 टक्क्यांनी वधारले. थिएटर्सवर निर्बंध लादल्यामुळे, पीव्हीआरचे (PVR share) शेअर्स लाल चिन्हात उघडले, जरी पहिल्या दोन तासात चांगल्या खरेदीच्या आधारावर, ते हिरव्या चिन्हात आले आणि 3.27 टक्क्यांच्या मजबूतीसह 1,340.80 वर बंद झाले. . त्याच वेळी, आयनॉक्स लेजरचे शेअर्सही किंचित वाढीसह बंद झाले. टाटा मोटर्सचा समभाग 3.13 टक्क्यांनी वाढून 497.45 वर बंद झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या