प्रातिनिधिक फोटो
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोसळणारं शेअर मार्केट या आठवड्यात चांगलं सुरू आहे. सोमवारी स्थिरावलं तर आज तेजीत आहे. एकवेळी २ रुपये किंमत असलेल्या शेअरनं आज गुंतवणूकदारांना डिव्हिडंट देऊन लखपती बनवलं आहे. हा शेअर एवढा वर जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र ज्यांनी जोखीम उचलून यामध्ये पैसे गुंतवले आज ते लखपती बनले. शेअर बाजारात गेल्या काही वर्षांत मोठ्या कंपन्यांसोबत छोट्या कंपन्यांनीही चांगले रिटर्न दिले आहेत. एनबीएफसी क्षेत्रातील एलसिड इन्व्हेस्टमेंट्सने गेल्या 5 वर्षांतील शेअरच्या किमतीच्या तुलनेत मोठा डिव्हिडंट देऊन गुंतवणूकदारांना खूश केले. हे वाचा-Share Market: मार्केट उघडताच या 20 Stocks मध्ये गुंतवणूक करा आणि भरपूर पैसे मिळवा एकेकाळी या कंपनीच्या शेअरची किंमत २ रुपये होती. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण घाबरले होते. आज २ रुपये किमतीच्या या शेअरने अलीकडेच 15 रुपयांचा अंतिम डिव्हिडंट जाहीर केला आहे. मोठी गोष्ट म्हणजे ही कंपनी सलग ५ वर्षे गुंतवणूकदारांना डिव्हिडंट देत आहे. Elcid Investment हा शेअर सध्या मार्केटमध्ये २.३१ रुपये आहे. त्याची किंमत १७ पर्यंत गेली होती. या स्टॉकची ट्रेडिंग खूप होताना दिसत नाही. २ लाख शेअर्सपैकी दीड लाख स्टॉक्स प्रमोटर्सजवळ आहेत. या कंपनीची स्थापना १९८१ मध्ये झाली. ही कंपनी शेअर आणि Mutual Funds मध्ये गुंतवणूक करते. हे वाचा-Stock Market Update: या कारणांमुळे सेन्सेक्समध्ये जबरदस्त तेजी, 800 अंकांनी वधारला या कंपनीच्या शेअरच्या किमतीचा गेल्या 5 वर्षांचा कल बघितला तर डिव्हिडंटची किंमत एक्स-डेट किमतीपेक्षा खूप जास्त आहे. आज हा शेअर 2.31 रुपयांवर उघडला. दुसरीकडे, सोमवारी शेअर 2.20 वर बंद झाला. आज या स्टॉकचे प्रमाण 1 कोटी 70 लाखांच्या जवळपास आहे. NBFC क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांनी प्रचंड पैसा कमावला आहे. यामध्ये बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्ससह अनेक कंपन्यांचा समावेश आहे.