तुम्हाला अजूनही ITR परतावा मिळालेला नाही? विलंबामागं असू शकतात 'ही' 3 कारणं
मुंबई, 14 सप्टेंबर: आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. जर तुम्ही या तारखेला किंवा त्यापूर्वी रिटर्न भरला असेल, पण रिफंड अजून आला नसेल, तर त्यामागं काही खास कारण असू शकते. प्रथम तुम्हाला ही कारणं जाणून घ्यावी लागतील आणि परतावा मिळण्यास विलंब का होत आहे हे समजून घ्यावं लागेल. या कारणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1-ITR प्रक्रिया पूर्ण झाली की नाही? सर्वप्रथम तुम्ही तुमची आयटीआर प्रक्रिया झाली आहे की नाही ते तपासा. त्यावर प्रक्रिया केल्यावरच तुम्हाला ITR परतावा मिळेल. आयटीआर प्रक्रिया झाल्यानंतर, कर विभाग तुम्हाला पुष्टी करेल की तुमचा परतावा झाला आहे, त्यानंतरच पैसे तुमच्या खात्यात येतील. जर कर विभागाला असे आढळून आले की तुमच्या नावावर कोणताही रिफंड झाला नाही, तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. एकदा ITR ची प्रक्रिया झाली आणि परतावा निश्चित झाला की, तुम्ही परतावा स्थिती एकदा तपासली पाहिजे. 2-बँक खात्याचे प्री-वॅलिडेशन: आयटीआरमध्ये ज्या बँक खात्याची माहिती दिली आहे, त्या बँक खात्याच्या प्री-व्हॅलिडेशनमध्ये काही अडचण आल्यास, तुम्हाला रिफंडचे पैसे मिळणार नाहीत. तुमचा पॅन तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला नसला तरीही, पैसे परत करणं थांबवले जाऊ शकतं. म्हणून, पॅन बँक खात्याशी लिंक आहे की नाही आणि खाते पूर्व-प्रमाणित आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे. हेही वाचा- Inflation : कर्जाच्या EMIचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता; महागाईचा काय परिणाम होणार? प्री-वॅलिडेशन तपासण्यासाठी, तुम्हाला टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावं लागेल ज्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. लॉगिन केल्यानंतर, माझी प्रोफाइलवर (My Profile) आणि माझं बँक खाते (My bank Account) निवडा. स्क्रीनवर तुम्हाला बँक खात्याच्या प्री-व्हॅलिडेशनची माहिती मिळेल. या खात्यात रिफंडचे पैसे आले असतील तर त्याची माहितीही येथे उपलब्ध होईल. 3- आउटस्टँडिंग डिमांड- तुमची मागील वर्षाची कोणतीही थकबाकी मागणी प्रलंबित असल्यास, आयकर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. कोणतीही थकबाकी मागणी प्रलंबित असल्यास, ती प्रथम तुमच्या परताव्यामध्ये समायोजित केली जाईल. ही माहिती तुम्हाला सूचनेद्वारे दिली जाईल. एकदा ITR ची प्रक्रिया झाल्यानंतर, कोणतीही नोटीस आली आहे का ते पाहण्यासाठी मेल तपासा. तुम्हाला नोटीस मिळाल्यावर तुम्हाला कळेल की परतावा देण्यास उशीर का झाला.
परताव्याची स्थिती कशी तपासायची?