JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI च्या ग्राहकांना धक्का;आता कर्ज घेणं महागणार, बघा किती वाढले व्याजदर

SBI च्या ग्राहकांना धक्का;आता कर्ज घेणं महागणार, बघा किती वाढले व्याजदर

एसबीआयने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णामुळे ग्राहकांना कर्ज (Costlier Loan) घेणं महाग पडणार आहे. नवीन दर हे 15 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : कोरोनाच्या संकटकाळ (Coronavirus Pandemic) आता हळूहळू सरतो आहे. अशातच देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India – SBI) ग्राहकांना धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णामुळे ग्राहकांना कर्ज (Costlier Loan) घेणं महाग पडणार आहे. नवीन दर हे 15 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. याआधी सप्टेंबरमध्ये बँकेने बेस रेट 5 बेसिस पॉइंट्सने कमी करून 7.45 टक्के केला होता. स्टेट बँक ऑफ इंडियानेही प्राइम लेंडिंग रेट (PLR) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीएलआर दर 2.5 टक्क्यांनी वाढवून 10 टक्क्यांवरून 12.30 टक्के करण्यात आला आहे. तर मूळ दरात 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. आता नवा दर 7.55 टक्के असणार आहे. म्हणजेच नवीन व्याजदर ग्राहकांना 0.10 टक्के दराने देय असणार आहेत. एसबीआयने FD दरही वाढवले  एसबीआयने 15 डिसेंबर 2021 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवींवरील (Term Deposits) व्याजातही वाढ केली आहे. तसेच 2 कोटी रुपयांपेक्षा रकमेच्या कमी एफडीच्या (FD) व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. FD Credit Card: फिक्स्ड डिपॉझिटवरही घ्या क्रेडिट कार्ड; प्रोसेस पाहा, तुमचं काम होईल सोपं ग्राहकांना बसला मोठा धक्का  एसबीआयने बेस रेट वाढवल्याने ग्राहकांना झटका बसला आहे. व्याजदर पूर्वीपेक्षा महाग झाल्याने कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे दरदेखील वाढणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. संपादरम्यान निर्णय  केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकाचे खासगीकरण करण्यात येणार असून हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा सुधारणा विधेयक आणण्याची सरकारची तयारी सुरू आहे. याला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) कडाडून विरोध केला आहे. म्हणून बँकेने 16 आणि 17 डिसेंबर 21 रोजी संपाची हाक दिली होती. या संपादरम्यानच एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; ‘या’ योजनेचा फायदा मिळेल आरबीआयच्या व्याज दरात बदल नाही  भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) 8 डिसेंबर 21 रोजी रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली होती. या निर्णयानंतर काही दिवसांत एसबीआयने मूळ दरात वाढ केली आहे. सध्या रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. काय असतो बेस रेट? बेस रेट हे बँक ठरवते. बेस रेटच्या आधारे बँकेच्या कर्जाचे व्याज ठरवले जाते. बेस रेट कर्जाचा हा किमान व्याज दर मानला जातो. बेस रेटपेक्षा कमी दराने बँका कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला कर्ज देऊ शकत नाहीत. बँक ग्राहकांला हा दर लागू असतो. व्यावसायिक बँका ग्राहकाला ज्या दराने कर्ज देतात, त्याला बेस रेट म्हणता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या