JOIN US
मराठी बातम्या / मनी / Multibagger Share: 2 रुपयांच्या शेअरची कमाल; 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनली 50 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Share: 2 रुपयांच्या शेअरची कमाल; 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनली 50 कोटी, तुमच्याकडे आहे का?

ब्रोकरेज फर्म शेअरखानचे म्हणणे आहे की एसआरएफ लिमिटेडचा स्टॉक यापुढेही गुंतवणूकदारांना चांगला नफा देऊ शकतो. कंपनी मॅनेटमेंटचे लक्ष केमिकल सेगमेंटवर असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर : SRF लिमिटेड शेअरने दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. 1999 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 2.06 रुपये होती, जी आता 2,604.90 रुपये झाली आहे. एसआरएफ लिमिटेडचा स्टॉक आता गुंतवणूकदारांना अधिक नफा देईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळेच ब्रोकरेज फर्म शेअरखानने याला बाय रेटिंग दिले आहे. SRF Ltd फ्लोरोकेमिकल्स, स्पेशालिटी केमिकल्स, पॅकेजिंग फिल्म्स, टेक्निकल टेक्सटाइल्स, कोटेड फॅब्रिक्स आणि लॅमिनेटेड फॅब्रिक्स तयार करते. ही एक लार्ज कॅप कंपनी आहे. गेल्या 23 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. लाइव्ह मिंटमधील अहवालानुसार, SRF लिमिटेडचा स्टॉक शुक्रवारी 2.30 टक्क्यांनी घसरून 2,604.90 रुपयांवर बंद झाला. हा मल्टीबॅगर स्टॉक 1 जानेवारी 1999 रोजी 2.06 रुपयांवर होता. तेव्हापासून हा शेअर अनेक पटींनी वाढला आहे. 1999 मध्ये जर कोणी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला त्यावेळी 48,543 शेअर्स मिळाले असते. कंपनीने 13 ऑक्टोबर 2021 रोजी बोनस शेअर्सही दिले. कंपनीने 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. बोनस शेअरनंतर 1999 मध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराकडे 1,94,172 होते. आजच्या SRF शेअर्सच्या किमतीवर नजर टाकली तर 1,94,172 शेअर्सची किंमत आता 50.67 कोटी रुपये झाली आहे. आता गुंतवणूक करावी का? ब्रोकरेज फर्म शेअरखानचे म्हणणे आहे की एसआरएफ लिमिटेडचा स्टॉक यापुढेही गुंतवणूकदारांना चांगला नफा देऊ शकतो. कंपनी मॅनेटमेंटचे लक्ष केमिकल सेगमेंटवर असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. पुढील 5 वर्षांत या विभागात 12,500 कोटी रुपये खर्च करण्याचा कंपनीचा मानस आहे. केमिकल बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा कंपनीला फायदा होईल, असे शेअरखानचे म्हणणे आहे. SRF शेअरला खरेदी रेटिंग देत, शेअरखानने त्याची टार्गेट प्राईज 2,960 रुपये दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या