नवी दिल्ली, 30 मे : भारत सरकारच्या नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) बजेट एअरलाइन असणाऱ्या स्पाइसजेट (SpiceJet)ला ड्रोनच्या माध्यमातून ई-कॉमर्स पार्सल डिलीव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. DGCA ने दिलेल्या या परवानगीनंतर स्पाइसजेट ड्रोनच्या मदतीने ई-कॉमर्स पार्सल, मेडिकल, फार्मा आणि अन्य जरूरी वस्तुंचा पुरवठा करेल. ग्रामीण भागात या वस्तू पोहोचवण्यासाठी हा पर्याय चांगला आहे. स्वस्त दरात केली जाणार डिलीव्हरी स्पाइसजेटने शुक्रवारी अशी माहिती दिली की, SpiceXpress कडून ट्रायल झाल्यानंतर त्यांची परवानगी मिळाल्यावर लवकरच परवडणाऱ्या दरात स्पाइसजेट वस्तूंंची डिलीव्हरी करणार आहे. SpiceXpress विमान कंपनी स्पाइसजेटचे कार्गो युनिट आहे. स्पाइसजेटच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या कन्सोर्टियमने ‘बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साइट’ (BVLOS) ऑपरेशनचा प्रयोग करण्यासंदर्भात नियामकांना याबाबत प्रस्ताव सादर केला होता. (हे वाचा- 167 महिलांना एअरलिफ्ट करत सोनू सूदची मोठी मदत, कोचीहून ओडिशामध्ये पोहोचवलं ) हे ऑपरेशन रिमोट पायलट असणाऱ्या विमानांसाठी असेल. DGCA ने यासंदर्भात एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) मागितला होता. BVLOS च्या एक्सपरीमेंट असेसमेंट आणि मॉनिटरिंग कमिटीच्या अहवालाच्या आधारावर SpiceXpress ला याप्रकारच्या संचालनाला मंजूरी देण्यात आली आहे. दरम्यान स्पाइसजेटने लेहमधील काही प्रवासी मजुरांना रांचीमध्ये पोहोचवण्याचे काम केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान येणाऱ्या काळात हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न या विमान कंपन्याकडून करण्यात येत आहेत.