यूनिक आयडी कार्ड
नवी दिल्ली, 5 मे: दिव्यांगांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दिव्यांगांना घरबसल्या स्वतःचे खास यूनिक आयडी कार्ड बनवता येणार आहे. खरंतर या पूर्वीचे युनिक आयडी कार्ड मॅन्युअली बनवले जात होते. यापूर्वी दिव्यांगजनांना हे कार्ड काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. दिव्यांग युनिक आयडी कार्ड बनवण्यासाठी, पूर्वी दिव्यांगजनांना सीएमओने तयार केलेले दिव्यांग प्रमाणपत्र फॉर्म भरून आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून त्यांच्या जवळच्या रेल्वे स्टेशनच्या स्टेशन अधीक्षक किंवा मुख्य बुकिंग पर्यवेक्षक कार्यालयात जमा करावे लागत होते. यानंतर, कमर्शियल निरीक्षकांकडून संबंधित रुग्णालयांनी दिलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर, दिव्यांगांचे युनिक ओळखपत्र योग्य असल्याचे आढळल्यासच डीआरएम कार्यालयातून तयार केले जात होते. मात्र आता रेल्वेने दिव्यांगांचे युनिक आयडी कार्ड बनवण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे.
दिव्यांग आता घरबसल्या वेबसाइटवर हे कार्ड तयार करु शकता. यामुळे ते आता एका क्लिकवर आपले नाव, आधार नंबर, ई-मेल, मोबाइल नंबर नोंदवू शकतील आणि आयडी तयार करू शकतील. यानंतर, लॉग इन करून, या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून, दिव्यांग युनिक आयडी कार्ड बनवण्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल.
सायबर कॅफेच्या मदतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. या संदर्भात बक्सरच्या गॅलेक्सी सायबर कॅफेचे संचालक दीपक कुमार यांनी सांगितले की, रेल्वेच्या https://divyangjanid.indianrail.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करून अपंगांचे UID कार्ड तयार केले जाते. या लिंकवर क्लिक करून दिव्यांग बांधव आपले नाव, ई-मेल, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक नोंदवून आयडी तयार करू शकतात. पुढे बोलताना दीपक कुमार म्हणाले की, जर साइट नीट चालली तर 1 ते 2 मिनिटांत UID ऑनलाइन अर्ज करता येईल. यूआयडी कार्ड तयार केल्यानंतर, दिव्यांग प्रवाशांनी तिकिटासाठी अर्ज करतात. असं केलं तर त्यांना त्यांच्या यूआयडी कार्डची फोटो कॉपी द्यावी लागेल. सध्या ही साइट ऑनलाइन करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. पण तरी रेल्वेने ही सेवा नव्याने सुरू केली असावी. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात काही त्रुटी आहेत.
रेल्वे स्टेशनवर विक्रेते MRP पेक्षा जास्त पैसे मागताय? अशी करा तक्रारऑनलाइन सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना दिव्यांग संघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रकुमार ठाकूर म्हणाले की, पूर्वी दिव्यांगजनांना यूआयडी कार्ड बनवण्यासाठी स्टेशन ते डीआरएम कार्यालय असा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण, आता घरी बसून किंवा कोणत्याही सायबर कॅफेमध्ये मोबाइलवरून ऑनलाइन यूआयडी कार्ड बनवल्याने दिव्यांगजनांना रेल्वे प्रवास करताना मोठा दिलासा मिळणार आहे.
1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतो मिनी कूलर, काही मिनिटांत थंडगार होईल घरUID साठी केलेला ऑनलाइन अर्ज प्रथम DRM कार्यालयाच्या कमर्शियल विभागाला प्राप्त होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कमर्शियल निरीक्षकांकडून संबंधित रुग्णालयातील अपंगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करताना, ते योग्य आढळल्यास, अपंगांचे यूनिक ओळखपत्र तयार केले जाईल. यानंतर दिव्यांग जन पोर्टलवर लॉग इन करून ते डाउनलोड करु शकतील.