मुंबई, 21 ऑगस्ट : सोन्यात गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर राहिले आहे. तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर केंद्र सरकारची योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही बाजारापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करू शकता. येथे सोन्याचे दागिने मिळत नाहीत मात्र यात गुंतवणुकीवर नक्कीच चांगला परतावा मिळू शकतो. केंद्र सरकारची सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सोमवारपासून म्हणजेच 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही योजना फक्त 5 दिवसांसाठी खुली असेल. यामध्ये तुम्हाला कोणतेही सोने किंवा नाणे प्रत्यक्ष मिळणार नाही, परंतु तुम्ही सोन्याची किंमत बाजारापेक्षा कमी दराने निश्चित करून गुंतवणूक करू शकता. त्याचा पहिला इश्यू जूनमध्ये उघडला गेला आणि दुसरा इश्यू 22 ऑगस्टला उघडेल. सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना वार्षिक 2.5% व्याज दर देते. जर तुम्ही त्याच्या मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला कोणताही कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही. ही योजना खूप फायदेशीर आहे आणि पहिल्या इश्यूला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
FD करताना वेगवेगळ्या बँकांमध्ये करा गुंतवणूक; सिक्युरिटी, वाढीव व्याजासह मिळतील ‘हे’ फायदे
गुंतवणूक कशी आणि किती काळासाठी कराल गोल्ड बॉण्ड्स कोणत्याही ग्राहक बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCIL), पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE कडून खरेदी केले जाऊ शकतात. एजंटमार्फतही गुंतवणूक करता येते. सॉव्हरेन गोल्ड बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. मात्र, 5 वर्षानंतरही पैसे काढता येतात. IDFC First बँकेच्या ग्राहकांना खूशखबर! बँकेकडून FD वरील व्याजदर वाढवले यामध्ये जास्तीत जास्त 4 किलो सोने गुंतवले जाऊ शकते. ही मर्यादा केवळ एका आर्थिक वर्षासाठी आहे. जोपर्यंत किमान गुंतवणुकीचा प्रश्न आहे, तो किमान 1 ग्रॅम सोन्यात गुंतवून सुरू करता येतो.