JOIN US
मराठी बातम्या / मनी / Sovereign Gold Bond: 10 जानेवारीपासून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा काय आहे योजना

Sovereign Gold Bond: 10 जानेवारीपासून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा काय आहे योजना

ही संधी केवळ पाच दिवसांसाठी 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत आहे. गुंतवणुकदारांकडे बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत सोनं खरेदीची संधी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 जानेवारी : सरकारकडून स्वस्त दरात गोल्ड खरेदीची संधी आहे. 10 जानेवारी 2022 पासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-2022 च्या अकराव्या सीरिजची विक्री सुरू होणार आहे. ही संधी केवळ पाच दिवसांसाठी 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत आहे. गुंतवणुकदारांकडे बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत सोनं खरेदीची संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 च्या नव्या सीरिजसाठी 4,786 रुपये प्रति ग्रॅम इश्यू प्राइस ठरवली आहे. गोल्ड बॉन्ड स्कीम सोमवारी सुरू होणार असून 14 जानेवारीपर्यंत याची खरेदी करता येऊ शकते. सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाईन अर्ज केल्यास, यात प्रति ग्रॅम 50 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. अशात गुंतवणुकदारांना ही गोल्ड बॉन्ड स्कीम 4736 रुपये प्रति ग्रॅम या दराने मिळेल. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इश्यू प्राईसवर दरवर्षी 2.50 टक्के निश्चित व्याज मिळतं. व्याजाचे पैसे प्रत्येक सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतात.

Personal Loan : आर्थिक संकटात पर्सनल लोन कधीही योग्य; काय होतो फायदा?

बॉन्डची विक्री व्यक्तिगतरित्या, भारताचे रहिवासी (Indian Citizens), हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट्स, विद्यापिठ आणि संस्थांना दान केली जाईल.

शेअर बाजारात स्टॉक निवडण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो; तोटा होणार नाही

सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉवरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्किमअंतर्गत व्यक्तिगत गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम आणि अधिकाधिक 4 किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्ट्ससारख्या संस्था दरवर्षी 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात. गोल्ड बॉन्डची विक्री बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त शेयर बाजारांद्वारे केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या