JOIN US
मराठी बातम्या / मनी / Sovereign Gold Bond: आजपासून सरकार विकणार स्वस्त सोनं! जाणून घ्या एक ग्रॅम सोन्याचा दर

Sovereign Gold Bond: आजपासून सरकार विकणार स्वस्त सोनं! जाणून घ्या एक ग्रॅम सोन्याचा दर

Sovereign Gold Bond: सॉव्हेरियन गोल्ड बाँड योजना आज 5 दिवसांसाठी खुली होणार आहे. आरबीआयने त्याची किंमत 5,109 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. तुम्ही यामध्ये 4 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा बाजारापेक्षा कमी किमतीत सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सरकार आजपासून जनतेला स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. आजपासून (28 फेब्रुवारी 2022) सॉव्हेरियन गोल्ड बाँडचा 10वा हप्ता (Sovereign Gold Bond Scheme 10th Series) रिलीज केला जात आहे. ही स्कीम फक्त पाच दिवसांसाठी ओपन असणार आहे. म्हणजेच, सॉव्हेरियन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 चा दहावा हप्ता 4 मार्च 2022 पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी ओपन असेल. भारत सरकारच्या वतीनं आरबीआय (RBI) हे सॉव्हेरियन गोल्ड बाँड जारी करते. गोल्ड बाँडची किंमत पाच हजार 109 रुपये प्रतिग्रॅम गोल्ड बाँड 2021-22मधील दहाव्या हप्त्याची इश्यु प्राईज पाच हजार 109 रुपये प्रतिग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, सॉव्हेरियन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 चा नववा हप्ता 10 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी (Subscription) खुला होता. या कालावधीत सोन्याची इश्यु प्राईज चार हजार 786 रुपये प्रतिग्रॅम होती. इश्यु प्राईजमध्ये मिळेल सूट रिझव्‍‌र्ह बँकेनं सांगितलं की, पाच दिवस सुरू असलेल्या या एसजीबी स्कीमसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रतिग्रॅम 50 रुपये (Discount on SGB) सवलत दिली जाणार आहे. ही सूट मिळवण्यासाठी त्यांना डिजिटल पेमेंट (Digital Payment) करावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना एसजीबी स्कीमच्या 10व्या सीरिजअंतर्गत एक इश्यु पाच हजार 59 रुपये प्रतिग्रॅम याप्रमाणे मिळणार आहे. Gold-Silver Prices Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दर वधारला कुठे करणार खरेदी? भारत सरकारच्या वतीनं आरबीआयनं एसजीबीचा 10वा हप्ता जारी केला आहे. हे बाँड सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मार्फत विकले जात आहेत. स्मॉल फायनान्स बँक (Small Finance Banks) आणि पेमेंट बँकांमध्ये (Payment Banks) हे बाँड विकले जाणार नाहीत, याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी. गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही किती गुंतवणूक करू शकता? सॉव्हेरियन गोल्ड बाँड स्कीममध्ये, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चार किलो सोन्याचे बाँड (Maximum Investment in SGB) खरेदी करू शकते. किमान गुंतवणूक मर्यादा (Minimum Investment in SGB) एक ग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे. ट्रस्ट किंवा तत्सम संस्था एका आर्थिक वर्षात 20 किलोपर्यंतचे गोल्ड बाँड खरेदी करू शकतात. जर तुम्हीदेखील सोनं खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर एसजीबी स्कीम तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या