देशातील या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार
Highest Average Salary In India : देशातील सर्वच कंपन्यांनी या आर्थिक वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले असतील. पगार हा विषय निघाला तर आपल्याला वाटतं मोठ्या शहरांमध्ये जास्त पगार मिळतो. देशातील दिल्ली, मुंबई , बंगळुरु, हैद्राबाद यांसारख्या शहरांमध्ये चांगला पगार मिळतो असा विचार तुम्हीही करत असला. पण देशातील सर्वात जास्त पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील एका शहरांने सर्वांना मागे टाकलंय. यात मुंबई पुण्याचं नाव नाही तर चक्क सोलापूर चं नाव अव्वल स्थानावर आहे. मुंबई, बंगळुरु, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांना मागे टाकून सोलापूर हे सर्वाधिक पगाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. सोलापुरात देशातील सर्वाधिक सरासरी वार्षिक वेतन मिळतंय असं एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. सोलापुरात सरासरी पगार किती? राज्यासह देशातही सोलापूर अव्वल स्थानावर आहे. मग सोलापूरमध्ये वार्षिक सरासरी पगार किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सोलापुरात एका व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 28,10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच 21.17 लाख रुपयांच्या सरासरी वार्षिक पगारासह मुंबई शहराचा दुसरा क्रमांक लागतो. तर बंगळुरु शहर हे 21.01 लाख रुपयांच्या सरासरी पगारासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीचा क्रमांक चौथा आहे. दिल्लीतील व्यक्तीचा सरासरी वार्षिक पगार 20.43 लाख रुपये आहे. Indian States : देशातील ‘या’ राज्यांमध्ये मिळते सर्वाधिक सॅलरी, चौथ्या राज्याचं नाव वाचून व्हाल चकित! देशातील ही शहरं वार्षिक पगाराच्या बाबतीत आहेत टॉपवर सोलापूर: 28,10,092 रुपये मुंबई: 21,17,870 रुपये बंगळुरू: 21,08,388 रुपये दिल्ली: 20,43,703 रुपये भुवनेश्वर: 19,94,259 रुपये जोधपूर: 19,44,814 रुपये पुणे: 18,95,370 रुपये हैदराबाद: 18,62,407 रुपये Richest People : जगातील 10 सर्वात श्रीमंत तरुण, 40 वर्षांपेक्षा कमी वयात कमावताय एवढा पैसा! पगाराच्या बाबतीत देशातील कोणतं राज्य आघाडीवरं? सोलापूर हे शहर देशात अव्वल आहे. पण राज्याचा विचार केला तर कोणतं राज्य उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे हे पाहूया. राज्याचा विचार केला तर उत्तर प्रदेश हे सर्वाधिक सरासरी वार्षिक पगारासह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरा क्रमांक हा पश्चिम बंगलाचा लागतो. यासोबतच जुलै 2023 मध्ये समोर आलेल्या सर्व्हेमधून समोर आलंय की, भारतातील सर्वात सामान्य वार्षिक पगार हा 5 लाख रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे.