JOIN US
मराठी बातम्या / मनी / SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग हे 5 मंत्र अवश्य घ्या जाणून

SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग हे 5 मंत्र अवश्य घ्या जाणून

SIP Tips to Invest: पैसा कमावण्यासोबतच तो योग्य ठिकाणी गुंतवणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमान वाढलंय. त्यासाठी काही खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

एसआयपी टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

SIP Tips to Invest: गुंतवणुकीसाठी लोक एफडी तसंच पीपीएफला बेस्ट मानतात. कारण यामध्ये कोणतीही जोखिम नसते. पण आता काही लोक जास्त रिटर्न मिळावे यासाठी एसआयपीमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14,734 कोटींहून अधिक गुंतवणूक आली. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या क्रेझचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की अकाउंटची संख्या विक्रमी 6.65 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. या वर्षी जूनमध्ये नवीन एसआयपी रजिस्‍ट्रेशन 2 27.78 लाखांपेक्षा जास्त होते. जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे. तुम्हीही यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पाच महत्त्वाचे मंत्र आपण पाहणार आहोत.

Consistency (सातत्य) SIP मध्ये सातत्य आवश्यक आहे. शॉर्ट टर्ममध्ये बाजारातील चढउतार लक्षात न घेता नियमित गुंतवणूक ठेवा. Long-Term Perspective (दूरदृष्टी) SIP मध्ये नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. यामुळे पावर ऑफ कम्‍पाउंडिंगचा फायदा होतो. तसेच, तुम्ही मार्केटमधील वॉलेटिलिटीपासून बचाव करु शकता. Education Loan घेण्यापूर्वी स्वतःला विचारा हे 4 प्रश्न! होईल फायदाच फायदा Diversification (विविधता) SIP गुंतवणुकीचे वेगवेगळे एसेट क्लास, सेक्टर्स आणि फंड्समध्ये वाटप करा. हे जोखीम कमी करण्यास आणि मजबूत रिटर्न मिळविण्यात मदत करतील. Patience (धैर्य) दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करत रहा. यामध्ये शॉर्ट टर्म मार्केट मूव्हमेंट किंवा बाजारातील चढउतारानुसार निर्णय घेणे टाळा. म्हणजेच धीर धरा. Business Ideas: अमूलसोबत सुरु करा ‘हा’ बिझनेस, कमी गुंतवणुकीत होईल लाखोंची कमाई! Review and Adjust (समीक्षा आणि जुळवून घ्या) ठराविक अंतराने नियमितपणे SIP गुंतवणुकीची समीक्षा करा. फंडाची कामगिरी आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण करा आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन फंडात बदल करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या