क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचे विविध प्रकार
मुंबई, 8 मे : सध्याच्या डिजिटल युगात पैशांच्या व्यवहारापासून ते खरेदीपर्यंतचे मार्ग बदलले आहेत. ऑनलाइन बँकिंगपासून ते सर्व प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बँका देत आहेत. यामध्ये ग्राहकांना विविध कॅटेगिरीमध्ये विविध सुविधांसह हे कार्ड दिले जातात. देशात ट्रांझेक्शनसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर सातत्याने वाढतोय. आता बँक खाते उघडताच, तुम्हाला डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ऑटोमॅटिक पद्धतीने जारी केले जाते.
बँक अकाउंट उघडत असताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार सिल्व्हर, गोल्ड कार्ड किंवा प्लॅटिनम कार्ड देखील निवडू शकता. बहुतेक ग्राहकांना याविषयी पुरेशी माहिती नसते. यामुळेच ते बँकेने दिलेले बाय डीफॉल्ट कार्ड वापरत असतात. मात्र प्रत्येक कार्डच्या आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या सुविधा असता. आज आम्ही तुम्हाला अशा सर्व कार्ड्सची सविस्तर माहिती देत आहोत. जेणेकरून क्रेडिट किंवा डेबिट कार्ड घेताना तुम्ही कोणत्या प्रकारची निवड करावी हे तुम्हाला समजेल. तुमच्या गरजा काय आहेत हे पाहून तुम्ही कार्ड निवडू शकता.
सर्वात आधी क्लासिक कार्डविषयी आपण बोलूया. हे अत्यंत बेसिक कार्ड असतं. या कार्डवर तुम्हाला जगभरातील सर्व प्रकारच्या कस्टमर सर्व्हिसेस मिळतील. याशिवाय, तुम्ही तुमचे कार्ड रिप्लेस बदलू शकता आणि इमरजेन्सीच्या परिस्थितीत तुम्ही अडव्हान्स पैसे देखील काढू शकता.
Credit Card पेमेंटची डेट निघून गेली? डोन्ट वरी, आता भरावा लागणार नाही दंडव्हिसा सिल्व्हर कार्ड अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्याबरोबरच परतफेडीच्या सुविधेत पूर्ण लवचिकता हवी आहे. यात 90% पर्यंत अडव्हान्स कॅशची लिमिट असते.
तुमच्या भाडेकरुने बनावट आधारकार्ड तर दिलेलं नाही ना? असं करा व्हेरिफायतुमच्याकडे गोल्ड व्हिसा कार्ड असल्यास, तुम्हाला ट्रॅव्हल असिस्टन्स, व्हिसाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेसचा फायदा मिळू शकतो. हे कार्ड जगभरात स्वीकारले जाते. या कार्डला ग्लोबल एटीएम नेटवर्क मिळते. म्हणजेच या कार्डचा वापर तुम्ही जागतिक स्तरावर करु शकता. यासोबतच जगभरातील रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर या कार्डचा वापर करून तुम्ही अनेक सूट मिळवू शकता.
हे कार्ड देखील गोल्ड कार्डप्रमाणे जगभरात स्वीकारले जाते. तुम्हाला कॅश डिस्बर्समेंटपासून ते जागतिक एटीएम नेटवर्कपर्यंत सुविधा मिळतात. यासोबतच, तुम्हाला मेडिकल आणि लीगल रेफरल आणि असिस्टेंस मिळते. यासोबतच हे कार्ड वापरून तुम्ही शेकडो डील, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधा मिळवू शकता.
तुम्हाला सिग्नेचर कार्डवर एअरपोर्ट लाउंज अॅक्सेससह इतर अनेक सेवा मिळतात.
मास्टरकार्डचे तीन प्रकारचे डेबिट कार्ड खूप प्रसिद्ध आहेत. ज्यांची नावे स्टँडर्ड डेबिट कार्ड, एन्हांस्ड डेबिट कार्ड आणि वर्ल्ड डेबिट मास्टरकार्ड आहेत. ज्यावेळी तुम्ही अकाउंट उघडण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला बँकेकडून एक स्टँडर्ड डेबिट कार्ड इश्यू होतं.