JOIN US
मराठी बातम्या / मनी / बापरे! 900 अंकांनी कोसळलं शेअर मार्केट, 4 लाख कोटींचं नुकसान; नेमकं काय घडलं

बापरे! 900 अंकांनी कोसळलं शेअर मार्केट, 4 लाख कोटींचं नुकसान; नेमकं काय घडलं

4 लाख कोटी रुपयांचं नुकसान आज शेअर बाजार बंद होताना झालं आहे. यामुळे शेअर मार्केटमधील टेन्शन आणखी वाढलं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे गुंतवणूकदारांना मात्र मोठा धक्का बसला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. अचानक सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला. त्यामुळे 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान आज शेअर बाजार बंद होताना झालं आहे. यामुळे शेअर मार्केटमधील टेन्शन आणखी वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या आर्थिक मंदीचं सावट आहे. याशिवाय तिथल्या बाजारपेठेतून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 1.5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

Demat Account ओपन केलंय पण वापरत नाही? असे करा बंद, जाणून घ्या प्रोसेस

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार शेअर बाजारात आज सर्वात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. यासह, अस्थिरता निर्देशांकात आज 11 टक्क्यांहून अधिक उसळी नोंदवण्यात आली. शेअर बाजार कोसळल्याने आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे ३.८८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज, बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 261.33 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं आहे. शेअर बाजारात मंगळवारी 265.21 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर होते. त्याच वेळी, गेल्या 4 दिवसांच्या घसरणीत, गुंतवणूकदारांचा तोटा वाढून 7 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

RBI Monetary Policy: RBI च्या निर्णयाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम

संबंधित बातम्या

अदानी समूहाच्या शेअर्सची विक्री, परदेशी बाजारातील घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे मिटिंग मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांची सावध भूमिका बाजारात पाहायला मिळाली. याशिवाय जिओ पॉलिटिक्स आणि आर्थिक मंदीचे संकेत देखील शेअर बाजारावर परिणाम करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या