मुंबई, 7 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील घसरणीचा आलेख थांबता थांबेना. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. रशियाचा युक्रेनवरील हल्ला आता केवळ दोन देशांपुरता नाही तर जागतिक विकासासाठी मोठा धोका बनत आहे. सेन्सेक्स (Sensex) आज 1400 अंकांनी खाली आला आहे. तर निफ्टी (Nifty) 15900 अंकांवर बंद झाली आहे. शेअर बाजारातील बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स1491.06 अंकांनी किंवा 2.74 टक्क्यांनी घसरुन 52842.75 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 382.20 अंकांनी किंवा 2.35 टक्क्यांनी घसरुन 15863.15 अंकांवर बंद झाला. रिअल्टी आणि निफ्टी बँक इंडेक्समध्येही मोठी घसरण झाली आहे. दोन्ही इंडेक्स 4 ते 5 टक्क्यांनी घसरले आहेत. शेअर बाजारातील 837 शेअर आज वधारले, 2543 शेअरमध्ये घसरण दिसून आली तर 129 शेअरमध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही. ATM मधून पैसे काढताना Green Light कडे लक्ष द्या, अन्यथा रिकामं होईल बँक अकाउंट याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 768.87 अंकांनी म्हणजेच 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह 54,333.81 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 252.60 अंकांनी किंवा 1.53 टक्क्यांनी घसरून 16,245.40 च्या पातळीवर बंद झाला. ऑटो, बँकिंग सर्वाधिक घसरले ब्रॉडर मार्केटमध्येही कमजोरी दिसली. निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 2.5 टक्के आणि 2.2 टक्क्यांनी घसरले. ऑटो, बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि रियल्टी यांना सर्वाधिक फटका बसला असून ते 4-5 टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरीकडे, मेटल आणि आयटी निर्देशांकात अनुक्रमे 0.1 टक्के आणि 0.75 टक्क्यांनी वाढ झाली. एका दिवसात गुंतवणूकदारांचे 5.44 लाख कोटींचं नुकसान आजच्या घसरणीनंतर शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 241.35 लाख कोटी रुपयांवर आले. गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे मार्केट कॅप 246.79 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 5.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. टॉप गेनर शेअर्स ONGC (13.13 टक्के), Hindalco (6.16 टक्के), Coal India (4.25 टक्के), Bharti Airtel (3.32 टक्के) , UPL (2.54 टक्के) हे शेअर निफ्टीतील टॉप गेनर शेअर ठरले. शेअर बाजार 7 महिन्यांच्या खालच्या पातळीवर, या पडझडीत तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप पिक्स; चेक करा टॉप लूजर शेअर्स तर IndusInd Bank (7.48 टक्के), Axis Bank (6.64 टक्के), Maruti Suzuki (6.60 टक्के), Britannia (6.46 टक्के), Bajaj Finance (6.32 टक्के) हे निफ्टीतील टॉप लूजर शेअर ठरले.