मुंबई, 21 फेब्रवारी : शेअर बाजारातील पडझडीची मालिका या आठवड्यातही सुरु आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार लाल निशाण्यासह बंद झाला. शेअर बाजार आज मोठ्या घसरणीसह सुरु झाला. मात्र मधल्या वेळेत बाजार करेक्शनही दिसून आलं. मात्र बाजार बंद झाला त्यावेळी बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 149.38 अंकांच्या किंवा 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह 57683.59 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 69.60 अंकांच्या किंवा 0.40 टक्के घसरणीसह 17206.70 अंकांवर झाला. Coal India, Hindalco, UPL, ONGC आणि Adani Ports हे शेअर निफ्टीतील टॉप लूझर ठरले. तर Wipro, Infosys, Shree Cements, Power Grid Corp आणि ICICI Bank निफ्टीतील टॉप गेनर शेअर ठरले. Multibagger share: दोन रुपयांच्या स्टॉकची मोठी झेप; एक लाख बनले 1.81 कोटी निफ्टी बँक वगळता आज सर्व इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. capital goods, FMCG, metal, oil & gas, pharma, power, realty इंडेक्स 1 ते 2 टक्क्यांनी घसरले. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.8 ते 2.2 टक्क्यांनी घसरले. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील ‘या’ शेअरला BUY रेटिंग, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस बिटकॉइन घसरुन 40,000 डॉलरच्या खाली क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात बिटकॉइन पुन्हा एकदा 40,000 डॉलरच्या खाली आले आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. गेल्या 24 तासांत यात 2 टक्क्यांनी घसरण झाली असून ती 39,156 डॉलर प्रति बिटकॉइन झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत बिटकॉइनच्या दरात 15 टक्के घट झाली आहे. बिटकॉइनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 69,000 डॉलरचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. बिटकॉइन सध्या त्या पातळीपेक्षा 40 टक्के खाली आहे. इथरियम ब्लॉकचेनशी जोडलेली इथर (Ether) ही बाजार भांडवलानुसार दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. ती देखील 3000 डॉलरच्या खाली आहे आणि सध्या प्रति इथर 2730 डॉलरवर व्यापार करत आहे. आज जागतिक क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप 2 ट्रिलियन डॉलरच्या खाली गेली आहे. CoinGecko च्या मते, गेल्या 24 तासात जागतिक क्रिप्टो बाजार 1.5 टक्क्यांनी घसरून 1.86 लाख कोटी रुपयांवर आला आहे.