मुंबई : नव्या वर्षाची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहात मग तुम्ही काही नवीन गुंतवणूक सुरू करायला हव्यात. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणार असाल किंवा गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. RBI प्रमाणेच शेअर बाजारातील सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. भारतीय शेअर बाजारांनी जाहीर केलेल्या 2023 सालच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार एनएसई आणि बीएसई या दोन कंपन्यांचे साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त यंदा आणखी 15 दिवस काम बंद राहणार आहे. 2023 साली शेअर बाजारात 15 दिवसांची सुट्टी असणार आहे. 2023 मधील शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. शेअर बाजाराची पहिली सुट्टी २६ जानेवारी २०२२ रोजी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीत. याशिवाय मार्च, एप्रिल, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सणवार असल्याने सुट्ट्या आहेत. त्या दिवशी स्टॉक मार्केट बंद राहणार आहे. फेब्रुवारी आणि जुलैमध्ये पूर्ण महिना शनिवार रविवार सोडल्यास काम सुरू राहणार आहे.
कोरोनाचा शेअर मार्केटवर परिणाम, SIP बंद करावी का?यंदा शनिवार आणि रविवार वगळता संपूर्ण वर्षात एनएसई आणि बीएसईचा 15 दिवस व्यवहार होणार नाही. २०२३ मध्ये शेअर बाजाराची पहिली सुट्टी २६ जानेवारी असेल. यंदा फेब्रुवारी आणि जुलै महिन्यात शेअर बाजारात सुट्टी मिळणार नाही. मार्चमध्ये 7 मार्चला होळी तर 30 मार्चला रामनवमी साजरी केली जाणार आहे. प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी होळी - 7 मार्च रामनवमी - 30 मार्च महावीर जयंती - 4 अप्रैल गुड फ्रायडे - 7 अप्रैल आंबेडकर जयंती - 14 अप्रैल महाराष्ट्र दिन - १ मे बकरी ईद - 28 जून स्वातंत्र्य दिन - 15 अगस्त गणेश चतुर्थी – 19 सप्टेंबर गांधी जयंती - 2 अक्टूबर दसरा – २४ ऑक्टोबर दिवाळी - 14 नोव्हेंबर गुरु नानक जयंती - 27 नोव्हेंबर ख्रिसमस - 25 डिसेंबर
1 जानेवारीपासून बदलणार लॉकरचे नियम, तुम्ही तर घेतलं नाही ना?यंदा 2023 मध्ये दिवाळी-लक्ष्मी पूजनानिमित्त मुहूर्त ट्रेडिंग 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 2023 मध्ये स्टॉक एक्सचेंजद्वारे मुहूर्त ट्रेडिंगची वेळ नंतर गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना सूचित केली जाईल. शेअर बाजाराच्या पारंपरिक नियमानुसार दरवर्षी दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगची तरतूद असते.