JOIN US
मराठी बातम्या / मनी / SEBI नं बदलले PAN नंबर संदर्भातील नियम, 1 एप्रिलपासून होणार लागू, वाचा काय होणार बदल

SEBI नं बदलले PAN नंबर संदर्भातील नियम, 1 एप्रिलपासून होणार लागू, वाचा काय होणार बदल

सेबीनं पॅनकार्ड आणि विशिष्ट ग्राहक कोड (Unique Client Code-UCC) याबाबतीतल्या अनिवार्य नियमांमध्ये बदल केले आहेत. जिंस डेरिव्हेटीव्हजचे व्यवहार करणाऱ्या सदस्यांना आपल्या ग्राहकांना विशिष्ट ग्राहक कोड वापरणं बंधनकारक करण्यास सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 09 मार्च : शेअर बाजार नियंत्रक सेबीनं (SEBI) डेरिव्हेटीव्हज व्यवहारांची सुविधा देणाऱ्या कंपन्यांची ग्राहकांकडून पॅन नंबर घेणं आणि त्यासंदर्भातील अडचणींमधून सुटका केली आहे. तसंच ई-पॅनच्या (E-PAN) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये तात्काळ पॅनकार्ड सुविधेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागानं (Income Tax Department) ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यंत्रणेवर आधारीत ई-केवायसीनंतर(E-KYC) तात्काळ पॅनकार्ड मिळू शकते. सेबीनं पॅनकार्ड आणि विशिष्ट ग्राहक कोड (Unique Client Code-UCC) याबाबतीतल्या अनिवार्य नियमांमध्ये बदल केले आहेत. जिंस डेरिव्हेटीव्हजचे व्यवहार करणाऱ्या सदस्यांना आपल्या ग्राहकांना विशिष्ट ग्राहक कोड वापरणं बंधनकारक करण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर या कंपन्यांना या ग्राहक कोडशिवाय व्यवहार करता येणार नाहीत. ई-पॅनचे व्हेरिफिकेशन वेबसाईटवरून करणं शक्य : डेरिव्हेटीव्हजचे व्यवहार करणाऱ्या शेअर बाजारातील सदस्यांना आवश्यक व्हेरिफिकेशन करून पॅनकार्ड घेणं आणि त्याचं रेकॉर्ड आपल्या कार्यालयात ठेवणं बंधनकारक आहे. ई-पॅनसाठी प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवरून व्हेरिफिकेशन करणं आवश्यक असून त्याची सॉफ़्ट कॉपी रेकॉर्डमध्ये ठेवणं आवश्यक आहे. एक एप्रिल 2021पासून हा नियम लागू होणार आहे. ई-पॅन बनवून घेण्याची प्रक्रिया : -प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा. - होम पेजवर ‘Quick Links’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करा. - यानंतर ‘Get New PAN’ च्या लिंकवर क्लिक करा. - ही लिंक थेट इन्स्टन्ट पॅन रिक्वेस्ट पेजवर नेईल. - आपला आधारनंबर आणि कॅप्चा कोड भरा. - ‘Generate Aadhar OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. - ओटीपी टाकल्यानंतर ‘Validate Aadhaar OTP’ वर क्लिक करा नंतर ‘Continue’ या बटणावर क्लिक करा. - आता पुन्हा तुम्ही पॅन रिक्वेस्ट पेजवर जाल. इथं आधारकार्डची माहिती खरी असल्याचं आणि नियम, शर्ती मान्य असल्याचं नमूद करावं लागेल. - यानंतर ‘Submit PAN Request’वर क्लिक करा. - यानंतर एक नंबर मिळेल, तो नोंदवून घ्या. ई-पॅन कसे डाऊनलोड करावं? - प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटच्या होमपेजवर ‘Quick Links’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करा. त्यानंतर इथं चेक स्टेट्स/ डाउनलोड पॅन या बटणावर क्लिक करा. आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. इथून तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता, त्याचं स्टेट्स चेक करू शकता. सेबी काय आहे? देशातील शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी एक सरकारी यंत्रणा म्हणजे सेबी. ज्याप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँक देशातील बँकावर नियंत्रण ठेवते त्याप्रमाणे सेबी शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या