JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ने ग्राहकांना केलं सावध; ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी दिल्या खास टिप्स

SBI ने ग्राहकांना केलं सावध; ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी दिल्या खास टिप्स

SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आपल्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध ठेवण्यासाठी ट्वीट करून माहिती शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये बँकेने ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग सांगितले आहेत.

जाहिरात

'HTTPS' Secure Sockets Layer किंवा Transport Layer Security चा उपयोग करुन युजरचं कनेक्शन एन्क्रिप्ट करतं. म्हणजेच ट्रान्सफर केलेला डेटा तुमच्या आणि रिसीवींग पार्टीमध्येच राहतो. याला कोणी हॅकर, स्कॅमर रीड करू शकत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 एप्रिल : गेल्या काही वर्षांत बँकिंग पद्धतीत (Banking System) मोठे बदल झाले आहेत. आता लोक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी बँकेत रांगेत उभं राहावं लागत नाही. ऑनलाइन (Inline Banking) पद्धतीने सगळे व्यवहार अगदी सोपे झाले आहेत. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI इत्यादीद्वारे पेमेंट करण्यास सुरुवात झाली आहे. याद्वारे, पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात लवकरात लवकर ट्रान्सफर केले जातात. एकीकडे फायदा होत असताना तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधी लोकांची फसवणूक केली आहे. ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) वेळोवेळी लोकांना अशा गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देत असते. अलीकडेच, SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आपल्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध ठेवण्यासाठी ट्वीट करून माहिती शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये बँकेने ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग सांगितले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये लोकांचा कल वाढला; वर्षभरात वाढले एक कोटी ग्राहक, तुम्हीही केली का गुंतवणूक?

संबंधित बातम्या

Car Loan: कार लोन घेताना ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा कर्ज डोईजड होईल ऑनलाइन व्यवहार करताना काय कराल? » कोणत्याही संशयास्पद मेसेजवर, ईमेलवर क्लिक करू नका, त्यावर कॉल करू नका. या लिंकवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील शेअर करू नका. » नेट बँक वापरण्यापूर्वी तुम्ही वापरत असलेले नेटवर्क सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. » तुमचे बँक तपशील जसे की बँक खाते विवरण आणि बँक पासबुक वेळोवेळी अपडेट करा. » तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास, https://cybercrime.gov.in/ वर क्लिक करून लगेच तुमची तक्रार नोंदवा. » तुमचे बँकिंग तपशील जसे की क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड क्रमांक, पिन, सीव्हीव्ही क्रमांक कोणासोबतही शेअर करू नका. तसेच तुमचा नेट बँकिंग पासवर्ड शेअर करू नका. » तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. » खोट्या माहितीपासून सावध रहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या