नवी दिल्ली, 15 एप्रिल: अलीकडे सायबर हल्ल्यांमध्ये (Cyber Attack) मोठी वाढ झाल्याने सर्वांनीच आपल्या बँक खात्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. याबाबत सर्वच बँकांकडून वारंवार ग्राहकांना सूचना देण्यात येतात. यावरून ग्राहकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. कोणालाही बँक खात्यासंदर्भात माहिती देऊ नये. तसेच बँक वेबसाईटच्या म्हणण्यानुसार ग्राहकांनी बँकेशी संबंधित कोणतीही माहिती मोबाईल किंवा स्मार्टफोनमध्ये सेव करू नये. अशा माहितीचा गैरवापर होऊन क्षणात एखाद्याचे खाते पूर्ण रिकामे होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. एसबीआयच्या (State Bank of India) सूचनेनुसार बँक खात्यासंदर्भातील माहिती किंवा ऑनलाईन बँकिंगची माहिती मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवू नये. खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर तसेच नंबरचा फोटो काढून ठेवणे टाळले पाहिजे. असे केल्यास ही माहिती लीक होण्याची शक्यता असते. स्मार्टफोनमध्ये जेव्हा तुम्ही अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल करता तेव्बा मोबाईलमधील फोटो किंवा संपर्क क्रमांक त्यांना वापरण्याची परवानगी दिलेली असते, त्यातून काही माहिती लीक होण्याची शक्यता असते. स्मार्टफोनमध्ये आपण इंटरनेटचा वापर करत असल्याने त्यातून बरेच व्हायरस देखील येण्याची शक्यता असते. त्यातून आपल्या माहितीशी छेडछाड केली जाण्याची शक्यता असते. अनेक संदेश येत असतात त्यामध्ये काही लिंक असतात आणि त्यावर क्लिक केल्यानंतर गिफ्ट वैगेर मिळेल, अशी आमिषं दाखवली जातात. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असते. (हे वाचा- Petrol Diesel Price: अखेर 15 दिवसांनी कमी झाले इंधनाचे भाव, काय आहेत आजचे दर ) तसेच बँकेकडून वारंवार सांगितल्या जात असलेल्या सूचनेनुसार आपल्या खात्याचा नंबर ओटीपी नंबर एटीएम चा नंबर किंवा पासवर्ड याची माहिती कोणालाही देऊ नये. काही हॅकर्स आपल्याला फोन करून तुमचे खाते बंद होईल किंवा इतर कारणे सांगून खात या संबंधीची माहिती मागवून घेतात. असे फोन आल्यास त्यांना कोणतीही माहिती देऊ नये. कारण बँकेकडून कधीही अशा प्रकारची माहिती मागवली जात नाही. बँकेच्या कोणत्याही कामासाठी बँकेच्या शाखेमध्ये येण्याची विनंती केली जाते मात्र थेट कधीही बँकेकडून कॉल करून कोणतीही माहिती मागितली जात नाही. याप्रकारे फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी असल्याने बँकेकडून वारंवार लोकांना सूचित केले जाते.