JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमचे सॅलरी अकाउंट आहे? मग SBI च्या 'या' स्किमविषयी वाचाच

तुमचे सॅलरी अकाउंट आहे? मग SBI च्या 'या' स्किमविषयी वाचाच

SBI च्या वेबसाइटनुसार, बँकेच्या या कस्टमाइज्ड पर्सनल लोनसाठी, ग्राहकाचे कोणत्याही बँकेत सॅलरी अकाउंट असणे आवश्यक आहे. त्यांची मिनिमम नेट मंथली सॅलरी रु.15,000 पेक्षा कमी नसावी.

जाहिरात

SBI सॅलरीड अकाउंट होल्डर्ससाठी खास स्किम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सॅलरी अकाउंट आहे का? असेल तर तुम्हाला बँकेकडून विशेष सुविधा मिळतात. SBI सॅलरीड अकाउंट होल्डर्ससाठी एक कस्टमाइज्ड पर्सनल लोन प्रोडक्ट ऑफर करते. यामध्ये लग्न, सुट्ट्या, इमरजेंसी, प्लान्ड खर्चासाठी पात्रतेनुसार झटपट वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाते. ग्राहकांना कोणत्याही गॅरंटीशिवाय कमीत कमी कागदपत्रांसह सवलतीच्या व्याजदरात कर्ज मिळते.

कसे मिळते लोन?

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, बँकेच्या या कस्टमाइज्ड पर्सनल लोनसाठी, ग्राहकाचे कोणत्याही बँकेत सॅलरीड अकाउंट असणे आवश्यक आहे. त्यांची मिनिमम नेट मंथली सॅलरी रु.15,000 पेक्षा कमी नसावी. बँकेचे म्हणणे आहे की, कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्रीय, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी असावी. यामध्ये EMI/NMI प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल. SBI च्या मते सॅलरीड कस्टमर्ससाठी डिझाइन केलेल्या या पर्सनल लोन उत्पादनांसाठी कोणतीही सुरक्षा किंवा हमी आवश्यक नाही.

दरमहा 18 हजारांहून जास्त उत्पन्न देणारी ‘ही’ स्किम होणार बंद, 1 एप्रिलपूर्वी घ्या लाभ

कर्जाची रक्कम किती?

SBI च्या एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन योजनेअंतर्गत, किमान 25,000 रुपये आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. यामध्ये, जास्तीत जास्त कर्ज ग्राहकाच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या 24 पट किंवा 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. दुसरीकडे, ओव्हरड्राफ्ट कर्जाची रक्कम कमीत कमी 5 लाख आणि जास्तीत जास्त 20 लाख/24 पट NMI असू शकते. यामध्ये, दुसरे कर्ज तुम्ही पहिल्या कर्जाची परतफेड केल्यावरच मिळेल. तसेच, जे पहिल्या कर्जामध्ये नियमित EMI पेमेंट करतात तेच दुसऱ्या कर्जासाठी पात्र असतील.

आता QR कोड स्कॅन करुन निघतील नाणी, RBI चा 12 शहरात पायलट प्रोजेक्ट

संबंधित बातम्या

SBI कर्ज योजना व्याज दर

SBI सॅलरीड कस्टमर्ससाठी Xpress क्रेडिट पर्सनल लोन स्‍कीमअंतर्गत व्याजदर 10.90%-12.40% प्रतिवर्ष पासून सुरू होतील. यामध्ये ग्राहकाला कोणतेही हिडेन चार्ज भरावे लागणार नाही, असे बँकेचे म्हणणे आहे. प्रोसेसिंग फीस देखील खूप कमी असेल. SBI च्या या खास पर्सनल लोनचे रिपेमेंट टेन्योर मिनिमम 6 महिने आणि मॅक्सिमम 6 वर्षे असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या