JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI देतेय 1 तासात कर्ज, 'असा' करा अर्ज

SBI देतेय 1 तासात कर्ज, 'असा' करा अर्ज

SBI, Loan - तुम्हाला तासाभरात गृहकर्ज मिळू शकतं. जाणून घ्या कसं ते

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 सप्टेंबर : तुम्हाला गृहकर्ज किंवा पर्सनल लोन हवंय? पण कर्ज घेताना लागणारा वेळ नको वाटतो. म्हणूनच आता नवी सिस्टिम येतेय.त्यामुळे तुम्हाला 1 तासात कर्ज मिळू शकतं. तुम्ही  PSB Loans in 59 Minutes द्वारे कुठल्याही टेंशनशिवाय कर्ज घेऊ शकता. या प्रोजेक्टला तत्वत: मंजुरी मिळालीय. SBI, PNB, बँक ऑफ बडोदा यांच्यासहित 10 सरकारी बँका PSB Loans in 59 Minutes द्वारे कर्ज देऊ शकतात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ही सुविधा सुरू केली होती. त्यात 59 मिनिटांमध्ये कर्ज मिळू शकतं. या योजनेचं नाव PSB Loans in 59 Minutes आहे. सोनं झालं महाग, चांदीही कडाडली, ‘हे’ आहेत गुरुवारचे दर या योजनेअंतर्गत 5 कोटींचं कर्ज केवळ 59 मिनिटांमध्ये मिळतं. कर्जाची रक्कम 8 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जाते. ही सुविधा गृहकर्ज आणि पर्सनल लोनसारख्या रिटेल लोनसाठीही सुरू केलीय. झटपट मिळेल कर्ज फायनॅन्शियल एक्सप्रेसमध्ये छापलेल्या बातमीनुसार लवकरच ऑटो कर्जासाठी ही सेवा लाँच होणार आहे. या प्लॅटफाॅर्मद्वारे ग्राहकांना बँक निवडण्यासाठी पर्याय मिळतील. कर्ज घेण्याची पूर्ण प्रक्रिया यामुळे सोपी होऊन जाईल. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, ‘अशी’ होईल निवड देशाची सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या एमडी गुप्ता यांनी सांगितलं की, 59 minutes portal द्वारे गृहकर्ज आणि पर्सनल लोनसाठी तुम्ही अर्ज करू शकता. SBIनं कार लोनवर कुठलीच प्रोसेसिंग फी न घेण्याचा निर्णय घेतलाय. सोबत ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी 8.70 टक्के व्याज दरावर कर्ज दिलं जाईल. एखादा ग्राहक बँकेच्या डिजिटल प्लॅटफाॅर्मवरून  (YONO) किंवा बँकेच्या वेबसाइटवरून कर्जासाठी अर्ज करत असेल तर त्याला व्याजात 25 बेसिस पाॅइंटची सवलत मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कारच्या ऑनरोड किमतीवर 90 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं जाईल. SBI नं शिक्षणासाठी आकर्षक ऑफर आणलीय. देशात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांना 8.25 टक्के व्याज दरावर 1.50 कोटी रुपयापर्यंत कर्ज दिलं जाईल. ते चुकवण्यासाठी 15 वर्षाचा अवधी दिला जाईल. त्यामुळे EMIचं ओझं कमी होईल. VIDEO : जम्बो दंड भरण्यातून वाहनधारकांना मोठा दिलासा, रावतेंनी केली ‘ही’ घोषणा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या