JOIN US
मराठी बातम्या / मनी / ATM मधून पैसे काढताना तुमची कधीच फसवणूक होणार नाही, SBI ने दिली महत्त्वपूर्ण माहिती

ATM मधून पैसे काढताना तुमची कधीच फसवणूक होणार नाही, SBI ने दिली महत्त्वपूर्ण माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील आता ट्वीट करून ATM मधून पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : इंटरनेट बँकिंगमुळे आजकाल ऑनलाइन व्यवहार अधिक होत आहेत. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम हे आजही सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. एटीएमच्या अतिवापरामुळे त्याच्याशी संबंधित फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहेत. एटीएम बदलून काहीजण लोकांची फसवणूक करतात किंवा एटीएम स्किमिंग करून गुन्हेगार लोकांचे खाते रिकामे करतात. बँका वेळोवेळी एटीएम वापराबाबत सूचना देत असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील आता ट्वीट करून ATM मधून पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने 2020 पासून ही सेवा सुरू केली आहे, परंतु, बहुतेक ग्राहक OTP आधारित एटीएम व्यवहार करत नाहीत. बँकेशी संबंधित ‘हे’ नियम 1 ऑगस्टपासून बदलणार, तुमच्या खिशावर कसा फरक पडेल? OTP वापरण्यासाठी टिप्स आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमध्ये, SBI ने ग्राहकांना ATM मधून पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने ट्वीटमध्ये म्हटलं की, एसबीआय एटीएममधील ओटीपी बेस्ड ट्रान्झॅक्शन हे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक उत्तम शस्त्र आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. SBI बँकेने 1 जानेवारी 2020 पासून OTP सेवा सुरू केली आहे. बँक ही माहिती वारंवार शेअर करते, जेणेकरून ती आपल्या ग्राहकांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करू शकेल. Money Mantra: मोठे आर्थिक व्यवहार करणार आहात? जरा थांबा; आर्थिकदृष्टया 26 जुलैचा दिवस असा असेल कशी वापरता येईल ही सुविधा? » एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रथम एटीएम मशीनमध्ये कार्ड घाला. » OTP पर्यायावर क्लिक करा. »तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, आता तो टाका. » यानंतर एटीएम पिन टाका. » एटीएम मशिनमधून रोख रक्कम दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या