नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : मोदी सरकारने सुरू केलेली सुकन्या योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे. 10 वर्षांखालच्या मुलींसाठी त्यांचं शिक्षण आणि लग्नाची आर्थिक तरतूद करण्याची संधी या योजनेत आहे. सध्या या योजनेत 8.4 टक्के व्याज मिळतं. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या योजनेत गुंतवणूक केली तर करात सूट मिळते. म्हणजे वर्षाला दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते. योजनेत मिळालेले रिटर्न्सही टॅक्स फ्री आहेत. काय आहे सुकन्या योजना ? जे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धोका पत्करू शकत नाहीत किंवा एफडीवर घटलेल्या व्याजामुळे तिथेही गुंतवणूक करायची नसते त्यांच्यासाठी ही सुकन्या योजना फायदेशीर आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI)हे खातं उघडता येतं. हे करताना मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये द्यावं लागेल. याबरोबरच पत्त्याचं प्रमाणपत्रही आवश्यक आहे. (हेही वाचा : मंदीचा सगळ्यात जास्त फटका या कार कंपनीला,गेल्या 9 महिन्यांत विकली गेली एकच कार) याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला https://www.sbi.co.in/portal/web/govt-banking/sukanya-samriddhi-yojana या वेबसाइटवर मिळू शकेल. मुलीच्या नावाने उघडलेल्या या खात्यात दरवर्षी कमीत कमी 250 रुपये जमा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करता येणार नाहीत. ======================================================================================== आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO