JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार

SBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार

SBI ने 1 फेब्रुवारीपासून IMPS करण्याचे नियम बदलले आहेत. यामध्ये तुम्हाला एका बाजूला फायदा होणार आहे आणि दुसरीकडे तोटा होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकेशी संबंधित अनेक नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून बदलणार आहेत. तुमचेही एसबीआयमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारीपासून अधिक शुल्क भरावे लागणार असल्याने आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. SBI ने 1 फेब्रुवारीपासून IMPS करण्याचे नियम बदलले आहेत. यामध्ये तुम्हाला एका बाजूला फायदा होणार आहे आणि दुसरीकडे तोटा होणार आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS ट्रान्झॅक्शनसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे, हा 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत असेल. SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST ​​असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहार करता येणार्‍या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्या खर्चावर काय परिणाम होणार? चेक करा IMPS म्हणजे काय? IMPS ला इमिडिएट मोबाइल पेमेंट सर्व्हिस म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सेवा आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी देते. ही सेवा रविवार आणि इतर सुट्ट्यांसह 24 X 7 उपलब्ध आहे. Manyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित, 4 फेब्रुवारीला इश्यू ओपन होणार IMPS हे एक लोकप्रिय माध्यम IMPS (Immediate payment Service) ग्राहकांमध्ये NEFT आणि RTGS पेक्षा अधिक लोकप्रिय आहे कारण ग्राहक 24 तासांत कधीही IMPS द्वारे त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या