एसबीआय कार लोन
SBI Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑटो लोन स्किममध्ये सेकंड हँड कार म्हणजेच प्री-ओन्ड किंवा यूज्ड कारसाठी फायनेंसची सुविधा मिळले. जर तुमचं बजेट जास्त नसेल तर सर्टिफाइड प्री-ओन्ड कार तुम्ही खरेदी करु शकता. एसबीआय सोप्या अटी आणि शर्थींवर सर्टिफाइड प्री ओन्ड कारला फायनेंस करते. या स्किममध्ये बँकेतून मिनिमम 3 लाख आणि मॅक्सिमम 1 कोटी रुपयांचं लोन घेतलं जाऊ शकतं. कोण किती लोन घेऊ शकतं? एसबीआयच्या उपलब्ध माहितीनुसार, सॅलरीड, सेल्फ इम्प्लॉइड, प्रोफेशनल्ससोबतच अॅग्रीकल्चर आणि त्यासंबंधित अॅक्टिव्हिटीमध्ये सामिल लोक देखील सेकंड हँड कारसाठी लोन घेऊ शकतात. यामध्ये सॅलरीड, सेल्फ इम्प्लॉइड आणि प्रोफेशनल्सचे वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे. तर अॅग्रीकल्चर आणि यासंबंधित अॅक्टिव्हिटीजमध्ये सामिल लोकांसाठी वार्षिक इन्कम लिमिट 4 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे. या लोनसाठी 21 ते 67 वर्षे वयाची लोक अप्लाय करु शकतात. SBI च्या सर्टिफाइड प्री-ओन्ड कार लोन स्कीम अंतर्गत, किमान 3 लाख रुपये आणि कमाल 1 कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड ग्राहकाला जास्तीत जास्त 5 वर्षांत करावी लागेल. यामध्ये कारच्या एक्स-शोरूम किमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. Govt Schemes : तुमच्या मुलींसाठी 5 सरकारी योजना, शिक्षणापासून लग्नापर्यंत भासणारी पैशांची कमतरता! व्याजदर, प्रोसेसिंग फिस किती असेल? SBI च्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सर्टिफाइड कार लोन कीमअंतर्गत कर्जाचे व्याजदर 11.25 टक्के ते 14.75 टक्क्यांपर्यंत आहेत. तर, प्रोसेसिंग फीस लोन अमाउंटच्या 1.25% आणि यासोबतच GST असेल. हे मॅक्सिमम र10,000 प्लस जीएसटी आणि मिनिमम 3,750 रुपये प्लस जीएसटी असू शकतं. Life Insurance Loan: लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवरही घेऊ शकता लोन, जाणून घ्या काय आहेत नियम डॉक्यूमेंट करा तयार SBI सर्टिफाइड प्री ओन्ड कार लोन स्किमसाठी अप्लाय करताना, तुम्हाला इनव्हॉइस प्रोफॉर्मा, सेलरच्या RC ची कॉपी, सेलरच्या मोटर इन्शुरन्सची कॉपी द्यावी लागेल. त्याचवेळी, लोन डिस्बर्समेंटच्या ठरलेल्या नियमांनुसार, डीलर आणि विक्रेता यांच्यातील विक्री करार, डीलरकडून हमीपत्र, बँक क्लिअरन्स द्यावे लागेल. यासोबतच विमाधारकाचे नाव आणि फायनान्सरमध्ये बदलाविषयी विमा कंपनीशी झालेल्या संभाषणाचे डिटेल्स द्यावे लागतात.बँकेकडून तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मिळेल. 1800-11-2211 वर कॉल करून तुम्ही या स्किमविषयी डिटेल माहिती मिळवू शकता.