एसबीआय
मुंबई, 2 जुलै : भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने आपल्या डिजिटल बँकिंग अॅप्लीकेशन YONO अपग्रेड केलं आहे. या अपग्रेडेड अॅपमध्ये बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना अनेक नवीन आणि खास सुविधा सहज मिळू शकतील. या अॅपमध्ये आता इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा मिळेल. बँकेत 68 व्या बँक सेलिब्रेशनच्या निमित्ताने रविवारी, 2 जुलैला ही सुविधा लॉन्च करण्यात आली. YONO अॅपच्या या अपग्रेडेड व्हर्जनच्या लॉन्च दरम्यान, SBI चे चेअरमन दिनेश खारा म्हणाले, ‘SBI प्रत्येक भारतीयाला सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजीचे डिजिटल बँकिंग सोल्यूशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुविधा देण्यासाठी देखील कटिबद्ध आहोत. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सोपे डिजिटल बँकिंग अनुभव लक्षात घेऊन YONO अॅप अपग्रेड केले गेले आहे." YONO अॅपवर मिळतील अनेक सुविधा YONO अॅपद्वारे बँक ग्राहकांना UPI फॅसिलिटी, स्कॅन आणि पे, कॉन्टॅक्ट्सद्वारे पेमेंट, रिक्वेस्ट मनी यासह अनेक विशेष सुविधा पुरवणार आहे. या वर्षी मे महिन्यात, नवीन SBI अकाउंट उघडण्यात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज वाटपाच्या संख्येत घट झाली आहे. LIC ने लॉन्च केली नवीन ‘धन वृद्धी’पॉलिसी, कधीही करु शकता सरेंडर, जाणून घ्या डिटेल्स बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर टेक्नॉलॉजीशी संबंधित समस्या आणि प्रभावी कस्टमर एंगेजमेंट धोरणाचा अभाव यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. बँकेच्या ग्राहकांनी YONO मोबाईल अॅपमधील विविध गैरसोयींबद्दल तक्रारी केल्या होत्या. 6 कोटीपेक्षा जास्त योनो अॅप यूझर्स परंतु, या गैरसोयींनंतरही, YONO हे देशातील सर्वात विश्वसनीय डिजिटल बँक अॅप म्हणून उदयास आले आहे. 2017 मध्ये हे अॅप लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 6 कोटींहून अधिक ग्राहक त्याचा वापर करत आहेत. व्यावसायिक वर्ष 2023 मध्ये, YONO अॅपद्वारे 78.60 लाख म्हणजेच 64% सेव्हिंग अकाउंट उघडण्यात आले आहेत. ATM Card वर का लिहिलेला असतो 16 डिजिटचा नंबर, तुम्हाला याचा अर्थ माहितीये? एटीएममधून पैसे काढणे होणार खूप सोपे आता इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू केल्यानंतर, SBI ग्राहकांव्यतिरिक्त, इतर बँकांचे ग्राहक देखील ICCW इनेबल्ड एटीएममधून कॅश काढू शकतात. यासाठी त्यांना UPI QR कॅश सुविधेचा लाभ घ्यावा लागेल. ICCW फॅसिलिटीमध्ये पिन आणि डेबिट कार्ड वापरण्याची गरज नाही. अशाप्रकारे, अशा एटीएममध्ये कार्ड आणि पिनशी संबंधित अनेक प्रकारची फसवणूक रोखण्यात मदत होते.