JOIN US
मराठी बातम्या / मनी / Saving Tips: पैशांची बचत होत नाहीत? 'या' गोष्टी ठरवा, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्की पैसे जमा होतील

Saving Tips: पैशांची बचत होत नाहीत? 'या' गोष्टी ठरवा, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्की पैसे जमा होतील

Saving and Investment: साधे जीवन जगूनही आपण चांगली बचत करू शकतो. गरज समजून घ्या आणि उधळपट्टी थांबवा. अनावश्यक वस्तूंवर खर्च टाळावा.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै : पैसा वाचवणे म्हणजे एक प्रकारे पैसे कमावण्यासारखे आहे. बचतीचे महत्त्व समजून आपण बचतीची सवय आपल्या जीवनात लावली पाहिजे. कारण आज केलेली बचत भविष्यातील गरजा किंवा गरजेच्या वेळी कामी येते. आपण कोणत्या पद्धतीने बचत करु शकतो, यासाठी काय करावं लागेल यावर एक नजर टाकूया. क्रेडिट कार्डचा वापर टाळा जर तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्डचा अनावश्यक वापर टाळा. जिथे क्रेडिट कार्डने जास्त खरेदी होते तिथे त्यावर आकारले जाणारे व्याजही जास्त असते. त्यामुळे क्रेडिट कार्डवर होणार खर्च टाळला तर चांगली बचत होऊ शकते. किती करायची ठरवा तुमच्या उत्पन्नानुसार बचतीचे ध्येय निश्चित करा. ठराविक रक्कम वाचवा. दरम्यान, तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून मागे हटू नका. जेणेकरुन तुमच्या गरजेनुसार बचत होईल आणि ती भविष्यातील नियोजनात कामी येईल. बचत करण्यासाठी, तुम्ही एकाच वेळी भरपूर बचत करण्याऐवजी लहान सुरुवात करावी. ही छोटी बचत पुढे मोठ्या बचतीच्या रूपात येईल. ITR Filing: शेवटचे 7 दिवस! अंतिम मुदतीपूर्वी IT रिटर्न फाइल न केल्यास होईल कारवाई साधं राहा, खर्च टाळा साधे जीवन जगूनही आपण चांगली बचत करू शकतो. गरज समजून घ्या आणि उधळपट्टी थांबवा. अनावश्यक वस्तूंवर खर्च टाळावा. जिथे गरज नाही तिथे केवळ दिखाव्यासाठी काही खर्च करु नका. जर तुम्हाला बचत करायची असेल तर तुमचे ध्येय मोठे असले पाहिजे हे लक्षात ठेवा. तसेच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगले नियोजन आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असतील तर उत्पन्नही वाढते आणि त्याचबरोबर बचतही वाढते. उत्पन्नाचा हा स्त्रोत घरभाडे, शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही बाजूच्या व्यवसायातून असू शकतो. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा, आता ‘या’ सेवेसाठी द्यावं लागणार नाही जास्तीचं शुल्क नियमित बचत चांगल्या बचतीसाठी, तुमची बचत नियमित असणे महत्त्वाचे आहे. हे करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ठराविक वेळी तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा करणे. उत्पन्नानुसार बजेट बनवा आणि प्रत्येक वस्तूंवर गरजेनुसार खर्च करा. तुमची बिले, बचत किंवा इतर खर्च आपोआप वजा होतील अशी व्यवस्था करा. गरज किंवा इच्छा? तुम्ही तुमच्या गरजेनुसारच खर्च करा. गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेतला पाहिजे. तुम्हाला खूप खरेदी करायची आहे, पण तुम्हाला तेच हवे आहे का? याचा विचार खरेदीआधी केला पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या