JOIN US
मराठी बातम्या / मनी / डॉलरने पुन्हा गाठला उच्चांक, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

डॉलरने पुन्हा गाठला उच्चांक, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

डॉलरच्या तुलनेत रुपया गेल्या काही आठवड्यांपासून घसरत असल्याचं दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : रुपया पुन्हा एकदा जोरात आपटला आहे. डॉलर चं मूल्य वधारलं असून 20 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. डॉलर 83. 08 रुपयांवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया गेल्या काही आठवड्यांपासून घसरत असल्याचं दिसत आहे. बुधवारी 83.02 रुपयांवर बंद झालेल्या रुपयात गुरुवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे. आता रुपयाचे मूल्य 1 डॉलरच्या तुलनेत 83.08 रुपयांवर पोहोचलं आहे. तर गुरुवारी रुपया ची ओपनिंग 83.01 झाली होती. रुपया 12% पेक्षा जास्त घसरला आहे याआधी बुधवारी रुपयात मोठी घसरण झाली होती. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. बुधवारी दिवसभरातील व्यवहारानंतर रुपया 82.36 पैशांनी घसरून 83 रुपयांवर बंद झाला. यंदा अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे 12 टक्क्यांनी अवमूल्यन झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या महिन्यात रुपयाचं 2 टक्क्यांनी अवमूल्यन झालं. जुलै २००८ नंतर 10 वर्षांच्या अमेरिकन बाँड यील्ड नेही सर्वोच्च पातळी गाठली आहे.

याचा परिणाम शेअर मार्केटवरही पाहायला मिळाला. कच्चा तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. एकीकडे जागतिक बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. याचा परिणाम आयातीवर होणार आहे. इंधनासह अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी भारतात मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. त्यामुळे याचा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पर्यायी महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचण्याची चिंता आहे. दिवाळी आधीच ही चिंता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या