आजपासून बदलणार नियम
मुंबई, 1 जून : मे महिना संपलाय आणि आता नवा जून महिना झालाय. हा महिना तुमच्या खिशासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात पैशांशी संबंधित असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि मासिक बजेटवर होईल. अशा वेळी हे बदल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन करु शकता.
RBI चे आर्थिक वर्ष 2023-24 मधील दुसरी पतधोरण घोषणा 8 जूनला होणार आहे. RBI ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे कर्जदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जून एमपीसीच्या बैठकीत विराम सुरू राहतो की दरात वाढ होते हे पाहावे लागेल. रेपो रेट वाढल्यास बँका पुन्हा एकदा कर्जावरील व्याजदर वाढवतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि इतर काही बँका त्यांच्या शाखांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन करत आहेत. बँक लॉकरबाबत बँकांचे अॅग्रीमेंट रिन्यू करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. परंतु आरबीआयने बँकांना 30 जून 2023 पर्यंत 50 टक्के आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 75 टक्के रिन्युअल करण्यास सांगितलेय.
एकाच बँक अकाउंटवरुन सर्व व्यवहार करता? मग ही माहिती तुम्हाला असायलाच हवीबाजार नियामक सेबी (SEBI) ने म्युच्युअल फंड योजनांबाबत नवा नियम जारी केलाय. या नियमानुसार आता पालक त्यांच्या मुलांच्या नावावर देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतील. हा नवा नियम 15 जूनपासून लागू होईल.
फ्रंट रनिंग आणि इनसाइडर ट्रेडिंग यांसारख्या फसवणुकीचा शोध घेण्यासाठी सेबीने मॉनिटरिंग आणि अंतर्गत नियंत्रण प्रणाली स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलाय. SEBI ने म्हटलंय की, अशी प्रणाली फ्रंट-रनिंग, इनसाइडर ट्रेडिंग, उत्पादनांची चुकीची विक्री, एसे मॅनेजमेंट कंपनी, तिचे कर्मचारी, वितरक, दलाल, डीलर्स यांच्याकडून माहितीचा गैरवापर शोधण्यात सक्षम असावी. रेग्युलेटरने 3 जूनपर्यंत प्रस्तावांवर टिप्पणी मागितली आहे.
How Internet Works: इंटरनेट कसं काम करतं कधी विचार केलाय? समुद्रात अंथरल्या आहेत ताराम्युच्युअल फंडांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, SEBI ने MF स्किममध्ये यूनिफार्म टोटल एक्सपेंस रेश्यो (TER) चा प्रस्ताव दिला आहे. म्युच्युअल फंडांसाठी हा बदलाचे मोठे पाऊल मानले जाईल. 1 जूनपर्यंत फीडबॅक करण्याची मुदत 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
असेसमेंट ईयर 2024-25 साठी अडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता देखील 15 जून रोजी भरला जाईल. याच तारखेला फायनेंशियल ईयर 2022-23 दरम्यान भरलेल्या वेतन आणि टॅक्स कटौतीच्या संबंधात कर्मचाऱ्यांना स्त्रोतावर टॅक्स कटोतीचे प्रमाणपत्र ही फॉर्म क्र. मधील तपशील सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPS साठी नवीन रायर पेन्शन स्किमसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. EPFO ने उच्च पेन्शन योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 3 मे ते 26 जून 2023 पर्यंत पुढे ढकलली होती.
Axis Bank क्रेडिट कार्डधारकांना भारतातील विविध विमानतळांवर मोफत लाउंज प्रवेश मिळतो. कार्ड प्रकारानुसार कॉम्प्लिमेंट्री लाउंज एक्सेस संख्येवर मर्यादा आहे. बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी विमानतळ लाउंज एक्सेस प्रोग्राम सुधारित केला आहे, जो 1 जून 2023 पासून प्रभावी आहे आणि 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध आहे.