मुंबई, 29 मे : देशात बनावट नोटांचे (Fake Notes) चलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) च्या ताज्या आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात बनावट नोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, 2020-2021 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 101.9 टक्के वाढ झाली आहे, तर 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 54.16 टक्के वाढ झाली आहे. TimesNow च्या अहवालानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यापैकी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 87.1 टक्के होता, जो 31 मार्च 2021 पर्यंत 85.7 टक्के होता. व्हॉल्यूमच्या बाबतीत, 31 मार्च 2022 पर्यंत 500 रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक हिस्सा 34.9 टक्के होता. त्यापाठोपाठ 10 रुपयांच्या नोटा आल्या, ज्या एकूण नोटांच्या 21.3 टक्के होत्या. भारत कॅशलेस पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडकडे वाटचाल करत असेल, परंतु आजच्या काळात 100 रुपयांच्या नोटेला रोख व्यवहारांसाठी सर्वाधिक पसंती दिली जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, व्यवहारासाठी 2,000 रुपयांच्या नोटांना कमी पसंती दिली जात आहे तर 500 रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. LIC Jeevan Labh योजनेत 10 रुपयांहून कमी गुंतवणूक करुन मिळवा 17 लाख, वाचा सविस्तर 50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा कमी झाल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 10, 20, 200, 500 (नवीन डिझाईन) आणि 2000 च्या बनावट नोटांमध्ये अनुक्रमे 16.4%, 16.5%, 11.7%, 101.9% आणि 54.6% वाढ झाली आहे. त्याच वेळी, 50 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 28.7 टक्के आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 16.7 टक्क्यांनी घट झाली आहे. 2000 रुपयांच्या नोटा झपाट्याने गायब आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या काही वर्षांपासून 2,000 रुपयांच्या नोटांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. यावर्षी मार्चअखेर एकूण चलनी नोटांमधील त्यांचा वाटा 214 कोटी किंवा 1.6 टक्क्यांवर आला. येत्या 1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! यावर्षी मार्चपर्यंत सर्व मूल्यांच्या एकूण नोटांची संख्या 13,053 कोटी होती. याआधी वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 12437 कोटी होता. आरबीआयच्या अहवालानुसार, मार्च 2020 अखेर चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांची संख्या 274 कोटी होती. चलनात असलेल्या एकूण नोटांच्या संख्येपैकी हा आकडा 2.4 टक्के होता.