JOIN US
मराठी बातम्या / मनी / अवघ्या 717 रुपयांचा होता शेअर, आज गुंतवणूकदारांनी कमावले डब्बल!

अवघ्या 717 रुपयांचा होता शेअर, आज गुंतवणूकदारांनी कमावले डब्बल!

गेल्या वर्षी 21 सप्टेंबरला रूट मोबाइल स्टॉकमध्ये (Route Mobile stock) गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे आज 2.82 लाख रुपये झाले आहेत.

जाहिरात

गेल्या वर्षी 21 सप्टेंबरला रूट मोबाइल स्टॉकमध्ये (Route Mobile stock) गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे आज 2.82 लाख रुपये झाले आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 ऑगस्ट : कोरोनामुळे बहुतांश कामं ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे टेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. अशाच रूट मोबाईल या एका टेक कंपनीने (Route Mobile) आपल्या गुंतवणूकदारांना चांगलंच मालामाल केलं आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 182 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. या मिड कॅप शेअरची (Mid Cap stock) लिस्टिंग प्राइज 717 रुपये होती; पण आता ही किंमत 2,025 रुपये झाली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात सेन्सेक्स तब्बल 84 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी 21 सप्टेंबरला रूट मोबाइल स्टॉकमध्ये (Route Mobile stock) गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे आज 2.82 लाख रुपये झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्येही या शेअरमध्ये 2.44 टक्क्यांनी वाढ (Route Mobile) झाली आहे. अगदी आज, शुक्रवारीही हा शेअर (Share Market news) चांगलाच तेजीत होता. या वर्षीच्या सुरुवातीपासूनच हा शेअर बेस प्राइजच्या (Route Mobile base price) तुलनेत 83 टक्क्यांनी वर होता. यापूर्वी 21 सप्टेंबर 2020 रोजी तो 625 रुपयांवर गेला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण होतं; मात्र त्यानंतर त्याने जी उसळी घेतली, ती आजपर्यंत कायम आहे. 5 जुलै 2021ला या शेअरची (Route mobile share growth) किंमत 2,308 रुपये एवढी होती. या फर्मची मार्केट कॅप (Route mobile market cap) 11,610 कोटी रुपये आहे. 2021 च्या जूनमध्ये संपलेल्या तिमाहीवेळी प्रमोटर्सकडे यातली 65.35 टक्के भागिदारी होती. सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीची 34.65 टक्के भागीदारी होती. जून तिमाहीच्या शेवटी 66 विदेशी गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 90.11 लाख (Route mobile shares) शेअर्स, म्हणजेच 15.61 टक्के भागीदारी होती. क्लाउड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म (Cloud communication platform) असलेल्या या कंपनीने, अशाच इतर कंपन्यांच्या तुलनेत शेअर मार्केटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. टीसीएस (TCS) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वर्षभरात अनुक्रमे 66.45 टक्के आणि 81.58 टक्के वाढ झाली आहे. या तुलनेत रूट मोबाइलने 84 टक्के वाढ दाखवून दमदार कामगिरी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये कंपनीने 26.9 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. यामध्ये 27.44 टक्के वाढीसह कंपनीने 34.3 कोटींचा नफा नोंदवला आहे. एकूणच या कंपनीने मोठ्या प्रमाणात नफा मिळवून आपल्या गुंतवणूकदारांनाही मालामाल केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या