JOIN US
मराठी बातम्या / मनी / रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देण्याची शक्यता; महागाईने त्रस्त नागरिकांवर पुन्हा EMI चा भार वाढणार?

रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देण्याची शक्यता; महागाईने त्रस्त नागरिकांवर पुन्हा EMI चा भार वाढणार?

RBI Repo Rate: आरबीआय ऑगस्ट महिन्यात रेपो दरात 25 ते 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास बँकांचे कर्जाचे व्याजदर महागतील. याचा भार नागरिकांवर EMI च्या रुपात पडेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने आधी लोकांवर EMI चा बोजा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने दोनदा मिळून रेपो रेटमध्ये 0.90 टक्के वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा व्याजदर वाढणार का याची चिंता नागरिकांना सतावत आहे. कारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. यावेळी आरबीआय रेपो रेटमध्ये 25 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. असं झाल्यास EMI महाग होईल. एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे अडचणीत भर पडली आहे. आयात महाग झाली आहे. जूनमध्ये, किरकोळ महागाईचा दर RBI च्या टॉलरन्स लेव्हलपेक्षा 7.01 टक्क्यांवर राहिला. त्याचवेळी अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. असे मानले जात आहे की फेड रेपो दरात 75 बेसिस पॉईंटने वाढ करू शकते. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. Flipkart वरील टी-शर्टमुळे सुशांत सिंहचे चाहते का झाले नाराज? ट्विटरवर #BoycottFlipkart ट्रेडिंग रेपो रेटमध्ये किती वाढ होण्याची शक्यता सद्यस्थितीनुसार आरबीआय ऑगस्ट महिन्यात रेपो दरात 25 ते 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्सची वाढ होऊ शकते असे बँक ऑफ बडोदाला वाटत आहे. तर एचडीएफसी बँकेच्या मते, रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ शक्य आहे. याआधी दोन चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात 90 बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. सध्या रेपो दर 4.90 टक्के आहे. व्याजदर आणखी वाढल्यास मागणी वाढण्यात अडचण निर्माण होईल आणि त्याचा फटका अनेक क्षेत्रांना सहन करावा लागू शकतो. चोरीच्या दागिन्याची माहिती देणाऱ्यास 57 कोटींचं बक्षीस जाहीर; दागिन्यांची किंमत ऐकून थक्क व्हाल! जीएसटीमध्ये अनेक पॅकिंग जीवनावश्यक वस्तूंचा समावेश केल्याने त्या वस्तूचे दर वाढले आहेत. दही, पनीर, लस्सी, पीठ अशा काही वस्तूंचा जीएसटीमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांचं रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या