मुबंई, 12 जुलै : देशातील महागाईने (Inflation) सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. यातून कधी सुटका होईल आणि खर्चाचं बजेट कधी आवाक्यात येईल याकडे सर्वाचं लक्ष आहे. मात्र या महागाईच्या संकटातून लवकर सुटका होणार नसल्याचं रॉयटर्सच्या एका सर्वेक्षणातून (Reuters Survey) समोर आलं आहे. उलट रेपो रेटमध्ये (Repo Rate) येत्या काळात वाढ झाल्यास तो एक बोजा सर्वसामन्यांवर पडू शकतोय. यावर्षाचे 6 महिने निघून गेले, पण पुढील 6 महिन्यांतही दिलासा मिळेल, असे दिसत नाही. भारतातील महागाईची पातळी या संपूर्ण वर्षासाठी रिझर्व्ह बँकेच्या टॉलरन्स बँडच्या वर राहू शकते. असेच चालू राहिल्यास येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होणार, असं रॉयटर्स सर्वेक्षण दिसून आलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे आणि जूनमध्ये रेपो दरात एकूण 90 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. याचे जागतिक संकेत एप्रिलपासून मिळू लागले होते. ATM मधून चार व्यवहारानंतर पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर 173 रुपये द्यावे लागणार? ग्लोबल कमोडिटीने संकट वाढलं जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईचा दर रिझव्र्ह बँकेच्या (RBI) 6 टक्क्यांच्या टॉलरन्स लेव्हलच्या वर संपूर्ण वर्षभर राहिला आहे. 4 जुलै ते 11 जुलै या कालावधीतील रॉयटर्स पोलच्या अंदाजानुसार, 2022 च्या Q3 आणि Q4 मधील महागाई अनुक्रमे 7.3% आणि 6.4% असू शकते. मागील सर्वेक्षणात, वर्षाच्या अखेरीस महागाई RBI च्या टॉलरन्स बँडमध्ये येईल असे म्हटले होते. लाइव्ह मिंटमधील एका अहवालानुसार, पँथिऑन मायक्रोइकॉनॉमिक्सचे इकोनॉमिस्ट मिगुएल चान्को म्हणाले, भारतातील महागाई या इतर प्रदेशाच्या तुलनेत जास्त त्रास देऊ शकते. गोष्टी चांगल्या होतील, परंतु आशियातील इतर भागांमध्ये भारत खूप लवकर यातून सावरेल. रिझर्व्ह बँकेची तीन बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई, तुमचंही ‘या’ बँकांमध्ये खातं आहे का? रेपो दर 5.50% होऊ शकतो RBI कडून रेपो दरात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे, जो सध्या 4.90% आहे. असे समजते की या वर्षाच्या अखेरीस रेपो दर 5.65% पर्यंत वाढू शकतो. जूनमध्ये झालेल्या इतर सर्वेक्षणापेक्षा हा दर थोडा जास्त आहे. त्या सर्वेक्षणात हा दर 5.50% वर्तवण्यात आला होता. ताज्या सर्वेक्षणात, 48 पैकी 25 अर्थतज्ञांनी तिमाहीच्या अखेरीस रेपो दर दर 5.50% किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.