JOIN US
मराठी बातम्या / मनी / Reliance Jio ला चौथ्या तिमाहीत मोठा फायदा, नफ्यात 177 टक्यांची झाली वाढ

Reliance Jio ला चौथ्या तिमाहीत मोठा फायदा, नफ्यात 177 टक्यांची झाली वाढ

जानेवारी-मार्च या काळात जिओच्या नफ्यात 177 टक्के वाढ झाली असून एकूण 2331 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 एप्रिल : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने चौथ्या तिमाहीमध्ये जबरदस्त नफा कमावला आहे. जानेवारी-मार्च या काळात जिओच्या नफ्यात 177 टक्के वाढ झाली असून एकूण 2331 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तर याच काळात जिओची कमाई 14835 कोटी इतकी झाली. चौथ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा अॅवरेज रिव्हेन्यू पर युजर्स 128 रुपयांवरून 130.60 रुपये इतका झाला आहे. चौथ्या तिमाहीत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 37 कोटींवरून 38.75 कोटी झाली. गेल्या आठवड्यात जिओ आणि फेसबुक यांच्यात करार झाला. यानुसार फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये 43,574 कोटींची गुंतवणूक कऱण्याची घोषणा केली होती. भारतात टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये ही एफडीआ अंतर्गत सर्वात मोठी गुंतवणूक आहे. हे वाचा :  आर्थिक संकटात रिलायन्सने घेतले मोठे निर्णय; मुकेश अंबानींनी सोडलं वेतन रिलायन्स जिओला चौथ्या तिमाहीमध्ये 2331 कोटींचा नफा झाला. या काळात जिओची कमाई 14835 इतकी झाली. रिलायन्स जिओची गेल्या महिन्यातील कमाई 13998 इतकी होती. रिलायन्स इंड़स्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, आम्हाला आनंद आहे की आम्ही या कठीण काळातही ग्राहकांना कनेक्टीव्हीटी सहज देऊ शकलो आणि काम सोपं करता आलं. जिओचे प्रत्येक कर्मचारी हे पहिल्यांदा ग्राहकांना प्राधान्य देतात. यामुळे ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. हे वाचा :  भारतीय मुलीची चॉइस NASA ला आवडली, पहिल्या मार्स हेलिकॉप्टरला दिलं हे नाव संपादन - सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या