मुंबई, 18 एप्रिल : टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या सोयीनुसार नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असतात. कधी कधी जुन्या प्लॅन्समध्ये थोडाफार बदल करून तेच नव्याने आणले जातात. तुम्ही स्वस्त प्लॅन्स शोधत असाल, ज्यामध्ये मोबाइल डेटा आणि फ्री कॉल्स उपलब्ध असतील, तर आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. एअरटेल (Airtel) आणि जिओचे (Jio) 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन्स कोणते आहेत, याची माहिती घेऊ या. एअरटेलचे प्लॅन्स (Airtel Plan) एअरटेलने ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन्स आणले आहेत. एअरटेल 300 रुपयांपेक्षा कमी ऑफरमध्ये 209, 239 आणि 265 रुपयांचे प्लॅन्स देत आहे. त्यामध्ये दररोज 1 GB डेटा मिळेल. या सर्व प्लॅनची व्हॅलिडिटी कालावधी वेगळा आहे. 209 रुपयांच्या प्लॅनची वैधता 21 दिवस, 239 रुपयांच्या प्लॅनची वैधता 24 दिवस आणि 265 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. एअरटेल कॅलेंडर योजना Airtel ने अलीकडेच कॅलेंडर प्लॅन लाँच (Calendar Plan) केला आहे, ज्याची किंमत 296 रुपये आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल (Unlimited Calls), दररोज 100 SMS आणि एकूण 25GB डेटा उपलब्ध आहे. एकदा डेटा संपल्यानंतर, युझर्सना प्रत्येक एमबीसाठी 50 पैसे द्यावे लागतील. Smartphone मध्ये आग लागण्याची 5 महत्त्वाची कारणं, अशी घ्या काळजी रिलायन्स जिओ प्लॅन रिलायन्स जिओचा 259 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. जिओच्या 259 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. रोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत खाली येतो. डेली डेटा बेनिफिटसह रिलायन्स जिओतर्फे अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (Unlimited Voice Calling) आणि दररोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. जिओचा 239 रुपयांचा प्लॅन रिलायन्स जिओचा 239 रुपयांचा प्लॅनदेखील 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. जिओच्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. डेली डेटा बेनिफिटसोबत, रिलायन्स जिओ अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये Jio Movie, Jio Cloud यांसारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शनदेखील उपलब्ध आहे. Railway Ticket बुक करताना कशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ, IRCTC ने सांगितला नियम तुम्ही एअरटेल किंवा जिओचे युझर्स असाल आणि चांगल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर वर दिलेल्या ऑफरमधून तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल, अशा ऑफरचा रिचार्ज करू शकता. तुमच्या भागातला इंटरनेट स्पीड आणि रिचार्जवर मिळणाऱ्या इतर ऑफर्स यावरून तुम्ही तुमच्या आवडीचा रिचार्ज प्लॅन घेऊ शकता.