बँक अकाउंट
मुंबई, 2 जूलै : सध्याच्या काळात अनेक लोकांकडे बँकेत एकापेक्षा जास्त बँक असाउंट असतात. पण कोणती व्यक्ती किती बँक अकाउंट ओपन करु शकते याविषयी अनेकांना माहिती नसते. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक अकाउंट संख्येविषयी काय नियम केले आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आरबीआयने केलेल्या नियमांनुसार कोणतीती व्यक्ती कितीही बँक अकाउंट ओपन करु शकते. ग्राहक 2, 3, 4, 5 कितीही बँक खाती उघडू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक खात्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही .तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय अनेक बँकांमध्ये अनेक सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. तसेच, जर तुम्ही अकाउंटमधील मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता पूर्ण करू शकत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. PPF अकाउंट मॅच्योर झाल्यावर मिळतात हे 3 ऑप्शन! यात गुंतवणूक केली असेल तर अवश्य घ्या जाणून किमान बॅलेन्स ठेवणे आवश्यक, अन्यथा… आता सेव्हिंग अकाउंट वगळता जवळपास प्रत्येक बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवावे लागेल. तुम्ही असे न केल्यास तुमच्या बँक अकाउंटमधून चार्ज कट होईल. चार्ज कट केल्यानंतरही तुम्ही मिनिमम बॅलेन्स मेंटेन केलं नाही, तर तुमचे बँक अकाउंट निगेटिव्हमध्ये जाईल. Home Loan Tips: होम लोन घेताना फक्त व्याजदर नाही तर ‘या’ 5 गोष्टीही अवश्य घ्या समजून, होईल फायदाच फायदा अनेक प्रकारचे बँक अकाउंट करता येतात ओपन बँकेच्या वतीने ग्राहकांना अनेक प्रकारचे बँक अकाउंट उघडण्याची सुविधा दिली जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सॅलरी अकाउंट, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकता. बहुतेक ग्राहक सेव्हिंग अकाउंट उघडतात. तुम्हाला या अकाउंटवर व्याजाचा लाभही मिळतो. हे एक बेसिक बँक अकाउंट आहे.