मुंबई, 13 फेब्रुवारी : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investors) केल्यावर अनेकदा मोठ्या डाऊनफॉलमध्ये गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होतं. मोठमोठे गुंतवणूकदार शेअर बाजारातून कशी रग्गड कमाई करतात हे आपल्याला दिसतं. मात्र त्यांचं होणारं नुकसानही तितकच मोठं असतं. बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनाही असाच झटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) समाविष्ट असलेल्या टायटन (Titan Company) आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सला (Star Health Insurance) शुक्रवारी 426 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे त्याच्या संपत्तीतही घट झाली आहे. तुमच्याही पोर्टफोलिओमध्ये या दोन कंपन्यांचे शेअर्स असतील तर त्याबाबत योग्य निर्णय घ्या. महागाईने अमेरिकेचा खेळ बिघडवला अमेरिकेत चलनवाढीचा दर 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर जागतिक बाजारात विक्रीचा जोर आला. त्यामुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. त्यामुळे टायटनचा शेअर एकाच दिवसात 53.20 रुपयांनी घसरला. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरच्या किमतीतही प्रति शेअर 18.55 रुपयांनी घसरण झाली. या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. नवीन आणि जुन्या टॅक्स स्लॅबपैकी कोणता फायदेशीर? जास्त सूट कुठे मिळेल? चेक करा डिटेल्स दोन्ही कंपन्यांची होल्डिंग किती आहे? टायटनच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीतील भागधारकांच्या पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांची कंपनीमध्ये होल्डिंग 3,57,10,395 इक्विटी शेअर्स आहे. रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 95,40,575 आहे. अशा प्रकारे, दोघांची एकत्रित होल्डिंग 5.09 टक्के म्हणजेच 4,52,50,970 शेअर्स आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये दोघांचे मिळून 10,07,53,935 (17.50 टक्के) शेअर्स आहेत. स्वत:चं घर घ्यायचं आहे पण Down Payment मुळे अडलंय काम? फंड मिळवण्यासाठी हे आहेत पर्याय टायटनमुळे 240 कोटींचं नुकसान टायटनच्या शेअर्समध्ये 53.20 रुपयांची घसरण झाल्याने राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 240 कोटी रुपयांची घसरण झाली. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या घसरणीमुळे 186 कोटी रुपयांचे नुकसान झाले. दोघांना मिळून 426 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.