मुंबई, 21 मे : ट्रेन सुटणे ही काही मोठी गोष्ट नाही. अनेक वेळा उशिरा पोहोचल्यामुळे आपल्याला आपली ट्रेन पकडता येत नाही. तर कधी ट्रॅफिकमध्ये अडकून कोणीतरी आपली ट्रेन चुकवते. म्हणजेच देशात दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ज्या ट्रेनमध्ये तिकीट काढले होते त्या ट्रेनमध्ये चढू शकत नाहीत. याच कारणामुळे इंटरनेटवरही Can I get refund if I missed train म्हणजे माझी ट्रेन चुकली तर मला रिफंड मिळू शकतो का? हे खूप सर्च केलं जातं. चांगली गोष्ट म्हणजे तुमची ट्रेन चुकली तरीही तुम्ही ट्रेनच्या तिकिटासाठी भरलेल्या पैशाचे रिफंड मिळवू शकता.
रेल्वे तिकीट रिफंड नियमानुसार, तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार आहात ती ट्रेन तुम्हाला पकडता येत नसेल आणि तुम्ही प्रवास करू शकत नसाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला तिकिटाचे पैसे परत मिळू शकतात. रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तुम्हाला रिटर्नसाठी काही कागदपत्रे करावी लागतील.
तुम्हाला रिफंड मिळवण्यासाठी TDR दाखल करावा लागेल. चार्टिंग स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर एका तासाच्या आत तुम्ही TDR दाखल करू शकता. रेल्वेकडून प्रवाशांना ऑनलाइन आणि ऑफलाइन टीडीआर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिफंडसाठी टीडीआर फक्त रेल्वेद्वारे जारी केला जातो. रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 60 दिवस लागू शकतात.
इंटरनेट नसतानाही चालेल Google Maps, अनेकांना माहितीच नाही हा जुगाड!I-ticket ऑनलाइन बुक करता येते. हे तिकीट कागदी स्वरूपात उपलब्ध आहे. ट्रेन सुटल्यास आय-तिकिटांच्या रिफंडसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. त्यासाठी स्टेशन मास्टरकडे आय-तिकीट जमा करून टीडीआर घ्यावा लागेल. नंतर ते भरुन आणि GGM (IT), इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, इंटरनेट तिकीट केंद्र, IRCA बिल्डिंग, स्टेट एंट्री रोड, नवी दिल्ली 110055 येथे पाठवा.
FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर-बुक केलेल्या तिकीट हिस्ट्रीवर क्लिक करा. -ज्या PNR साठी TDR दाखल करायचा आहे ते निवडा आणि नंतर फाइल TDR वर क्लिक करा. -TDR रिफंड मिळवण्यासाठी तिकिटाच्या डिटेल्समध्ये प्रवाशाचे नाव सिलेक्ट करा. -लिस्टमधून TDR दाखल करण्याचे कारण निवडा किंवा दुसरे कारण टाकण्यासाठी “इतर” वर क्लिक करा. -आता सबमिट बटणावर क्लिक करा. -जर तुम्ही “Other” पर्याय निवडला असेल तर टेक्स्ट बॉक्स ओपन होईल. -यामध्ये रिफंडचे कारण लिहून सब्मिट करा. -TDR दाखल करताना कन्फर्मेशन दिसेल. -सर्व डिटेल बरोबर असल्यास OK वर क्लिक करा. -TDR एंट्री कन्फर्मेशन पेज PNR क्रमांक, ट्रांझेक्शन आयडी, रेफरेन्स नंबर, TDR टेटस आणि कारण दिसेल.