रेल्वेचे नियम
नवी दिल्ली, 27 जुलै : इंस्टा आणि फेसबुक रिल्सची सध्या प्रचंड क्रेझ आहे. तुम्ही जिथे पहाल तिथे लोक मोबाईलवरुन फोटो किंवा व्हिडिओ बनवताना दिसतता. अनेक लोक तर सोशल मीडियावर फेसम होण्यासाठी आपला जीवही धोक्यात टाकतात. पण तुम्हाला माहितीये का की, तुम्ही प्रत्येक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवू शकत नाही. असे अनेक ठिकाणं आहेत जिथे रिल्स बनवण्याला आणि सेल्फी काढण्यास बंदी आहे. यामध्ये र्लवे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे लाइनचाही समावेशआहे. रेल्वेच्या नियमांनुसार, या दोन्ही ठिकाणांवर परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणे एक गुन्हा आहे. यामुळे पुढच्या वेळी रेल्वे स्टेशनवर गेला तर प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे आणि रिल्स बनवणे टाळा.
सेल्फी आणि रील्सबाबत रेल्वेने लोकांना पुन्हा सावध केले आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने यासंदर्भात ट्विट करून नियमांची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘सावध! रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 आणि 147 नुसार रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी काढणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्यास 1000 रुपये दंड किंवा 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.’ AC आणि स्लीपर कोचमध्ये झोपण्याचा नियम बदलला! पाहा आता किती वाजता रिकामी करावी लागेल बर्थ यावरून रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी घेणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दंड आणि शिक्षा टाळण्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मवर रील बनवू नका किंवा सेल्फी घेऊ नका. रेल्वे ट्रॅकवर किंवा प्लॅटफॉर्मवर या दोन्ही गोष्टी करून तुम्ही कायद्याचे उल्लंघन तर करताच, पण तुम्ही तुमचा जीवही धोक्यात घालता. Railway : मीडल, साइड अपर आणि लोअर बर्थच्या नियमांमध्ये कन्फ्यूजन आहे? अवश्य वाचा हे नियम झाले आहेत अनेक अपघात फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात घालतात. रेल्वे वेळोवेळी लोकांना या धोक्यांचा इशाराही देते, परंतु तरीही अनेक लोक प्लॅटफॉर्मवर अॅक्टिंग किंवा नृत्य करताना आढळतात. लोक रेल्वे ट्रॅकवर किंवा बाजूला रील्स बनवतात आणि सेल्फी घेतात. ट्रॅकच्या कडेला फोटो किंवा सेल्फी काढताना, ट्रेनच्या धडकेने अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अपघात रोखण्यासाठी रेल्वे आता कडक कारवाई करतेय.