JOIN US
मराठी बातम्या / मनी / ट्रेनमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना घेऊन प्रवास करताय? नियमात झालाय मोठा बदल, अवश्य घ्या जाणून

ट्रेनमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना घेऊन प्रवास करताय? नियमात झालाय मोठा बदल, अवश्य घ्या जाणून

Child Journey in Train : तुम्हीही मुलांसोबत प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने मुलांच्या ट्रेनमधील प्रवासाबाबत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

जाहिरात

लहान मुलांच्या रेल्वे प्रवासाच्या नियमात बदल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Child Journey in Train : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज अनेक बदल करत असते. रेल्नेवे नुकताच लहान मुलांच्या प्रवासाबाबत बदल केला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. रेल्वेने मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी व्हावा यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तसेच आता महिला आणि बालकांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाला आहे. तुम्हीही तुमच्या मुलांसोबत ट्रेनमध्ये प्रवास करणार असाल तर तुम्हाला या बदलाची माहिती घ्यावी. रेल्वेने पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र बेबी बर्थ बनवण्याचा विचार सुरू केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये बेबी बर्थची सेकंड ट्रायल सुरू होणार आहे. याच्या यशानंतर सर्व ट्रेनमध्ये बेबी बर्थविषयी बदल केला जाईल. मात्र, लहान मुलांसाठी असलेल्या या स्पेशल बर्थचे भाडे किती असेल याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल.

लवकरच सुरु होणार दुसरी ट्रायल

काही काळापूर्वी ट्रेनमध्ये ट्रायल म्हणून बेबी बर्थची सुविधा सुरु करण्यात आली होती. त्याची चाचणी मे 2022 मध्ये लखनऊ मेलवरून सुरू झाली. काही दिवसांच्या चाचणीनंतर याच्या फायद्यांसोबतच काही कमतरता देखील समोर येऊ लागल्या. यानंतर बेबी बर्थमदील उणीवा दूर करण्याचे काम पुन्हा करण्यात आले. आता नवीन बदलांसह बेबी बर्थ पुन्हा दुसऱ्या ट्रायलसाठी तयार आहे. लवकरच त्याचीही ट्रायल केली जाईल.

पहिल्यापेक्षा जास्त आरामदायक

बेबी बर्थची कॉन्सेप्ट तयार करणारे नितीन देवरे यांनी सांगितले की, रेल्वे प्रवासादरम्यान आई आणि बाळाच्या बर्थवर कमी जागा असल्याने त्रास होत होता. ही समस्या लक्षात घेऊन बेबी बर्थची तयारी करण्यात आली आहे. मुलांनुसार बनवलेले हे नवीन डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक आणि सुरक्षित असेल.

ट्रेनने प्रवास करता ना? मग ट्रेन तयार करायला किती पैसे लागतात माहितीये? उत्तर जाणून व्हाल थक्क

या बर्थची डिझाइन कशी असणार?

पूर्वी बाळाचे बर्थ सामान्य सीट प्रमाणे खुले होते, त्यामुळे बाळांना इजा होण्याचा किंवा सामान पडण्याचा धोका होता. पण आता ते वरून झाकलेले असणार आहे. यामुळे आईलाही स्तनपान करता येईल आणि कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही. याशिवाय लहान मुलांना लक्षात घेऊन स्क्रीनवर कार्टूनही छापण्यात येणार आहेत.

IRCTC: या टूर पॅकेजने करा केदारनाथ-बद्रीनाथचे दर्शन, 1 जूनपासून सुरु होईल टूर

संबंधित बातम्या

तिकीट बुक करताना होईल वाटप

प्रत्येक कोचमध्ये प्रत्येक सीटसह हा नवीन बेबी-बर्थ बसवण्याची गरज नाही. जो प्रवासी तिकीट बुक करताना हा बेबी-बर्थ बुक करेल, त्याला रेल्वे त्याचे वाटप करेल. सीटवर बेबी बर्थ बसवण्यासाठी प्रवासी TTE किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतील. बेबी बर्थ हुकच्या मदतीने सामान्य बर्थला जोडता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या