मुंबई : प्रतीक्षा संपली आहे. आज देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेला सुरुवात करणार आहेत. कर्मशियल 5G सेवेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरुवात केली जाणार आहे. वेगवेगळ्या फेजमध्ये 5G सेवेचा विस्तार होणार आहे. जिओ, एअरटेल या दोन्ही कंपन्या आज या सेवेचा शुभारंभ करणार आहेत. १३ शहरांपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. यासाठी खास मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल उपस्थित असणार आहेत. या सेवेमुळे सरकारपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि सुरक्षेपासून ते सुविधांपर्यंत अनेक गोष्टी वेगानं सुरू होतील. त्यामुळे लाइफ स्टाइल अधिक चांगली होईल असा विश्वास आहे. सर्वासामान्य लोकांपर्यंत ही सेवा कधी पोहोचेल. त्याचे रिचार्ज दर कसे असतील याबाबतही आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. एक तृतीयांश मोबाईल कनेक्शन 5G वापरणारे असणार आहेत. या सेवेमुळे 5G मोबाईल खरेदी करण्याकडे तरुणांचा कल अधिक असल्याचं दिसत आहे. न्यूज १८ लोकमतवर तुम्हाला हा उद्घाटनाचा सुवर्णक्षण पाहता येणार आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 5G नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक खूप मोठा फायदा मिळवून देऊ शकते. परिवर्तन घडवून आणू शकते. स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवनिर्मितीला चालना देण्यासाठी तसेच ‘डिजिटल इंडिया’ची दृष्टी पुढे नेण्यास मदत करेल. भारतावर 5G चा आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.