JOIN US
मराठी बातम्या / मनी / भाज्यांचे दर कडाडले! टोमॅटो आणि बटाट्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता

भाज्यांचे दर कडाडले! टोमॅटो आणि बटाट्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत बटाटा आणि टोमॅटोचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : एकीकडे पेट्रोल डिझेल आणि भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्याच दरम्यान कांदा महाग होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आधीच महापुराने कांद्याचं नुकसान झालं आणि दुसरं म्हणजे कांद्यावर रोग आल्याने कांदा पिक वाचवण्याचे टेन्शन शेतकऱ्यांसमोर आहे. येत्या काही दिवसांत बटाटा आणि टोमॅटोचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मध्ये टोमॅटो आणि बटाट्याचं उत्पादन कमी झालं आहे. ४-५ टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने दरवाढ होऊ शकते. त्यामध्ये बदलत्या हवामानमुळे अवेळी झालेला पाऊस आणि पिकांचं होणारं नुकसान देखील आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कांद्याचं उत्पादन जास्त आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 मध्ये बटाट्याचे उत्पादन पाच टक्क्यांनी घटून 53.30 दशलक्ष टनांवर येण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 56.17 दशलक्ष टन होता.

सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

टोमॅटोचे उत्पादन गेल्या वर्षीच्या 21.18 दशलक्ष टनांच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घटून 20.33 दशलक्ष टनांवर येऊ शकतं असा अंदाज आहे. 2021-22 या पीक वर्षात कांद्याचे उत्पादन 31.27 दशलक्ष टनांनी जास्त होण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षी 26.64 दशलक्ष टन होता. दुसरीकडे पावसामुळे मोठं नुकसान झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये गवार, फ्लावर, शिमला मिर्ची, भेंडी, कोबी, वांगी अशा भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटली आहे. शेतात पाणी साचून दलदलीसारखी स्थिती असल्याने भाजीपाला सडलाही आहे आणि भाज्या काढण्यासही अडचणी येत आहेत.आता नवीन भाज्या तयार होऊन बाजारात येण्यात किमान एक ते दीड महिना लागू शकतो. त्यामुळे आवक सुरळित होईपर्यंत भाज्यांचे दर चढेच राहाण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतरही सोन्याचे दर चढेच राहणार? काय सांगतोय बाजाराचा मूड

संबंधित बातम्या

यंदा भाजीपाल्याचं उत्पादन घटल्याचा अंदाज व्यक्त केला तर फळांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्य लोकांना खिसा लवकर रिकामा करायची वेळ येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या