मुंबई, 26 जानेवारी: ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारची एक विशेष योजना लवकरच बंद होणार आहे. अजून तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर नक्की घ्या. कारण ह्या योजनेमधून तुम्हाला दर महिन्याला घरबसल्या 10 हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान वंदना योजनेची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे. प्रधानमंत्री खर्च वंदना योजना ही 10 वर्षांची पेन्शन योजना आहे. ज्यात ज्येष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन सुविधा मिळते. नियमांनुसार या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपयांची पेन्शन सुविधा दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत जर पती-पत्नीचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना जास्तीत जास्त 20 हजार रुपये पेन्शन मिळू शकतं. पेन्शन पद्धतीनुसार या योजनेतील एकूण परतावे देखील बदलू शकतात. वर्षाला 8.33 टक्के व्याज मिळणार आहे. सहा महिन्यांसाठी 8.13 तर तीन महिन्यांसाठी 8.5 तर महिन्याला 8 टक्के पेन्शन मिळू शकते. या योजनेत तकिमान व जास्तीत जास्त रक्कम निश्चित करण्यात आली आहे. आपण महिन्याला निवृत्तीवेतनाचा पर्याय निवडल्यास आपण किमान 1.5 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकता. वार्षिक पेन्शन पर्यायासाठी ते कमीत कमी 1 लाख 44 हजार तर जास्तीत जास्त 14 लाख 45 हजार रुपये गुंतवण आवश्यक आहे. सहा महिन्यांसाठी पेन्शन योजनेचा लाभ घेणार असाल तर ते कमीत कमी 1 लाख 47 हजार तर जास्तीत जास्त 14 लाख 76 हजार रुपये गुंतवण आवश्यक आहे. तीन महिना पेन्शन पर्याय निवडण्यासाठी किमान 1 लाख 49 हजार ते जास्तीत जास्त 14 लाख 90 हजार रुपये गुंतवणं आवश्यक आहे. हेही वाचा- JOB करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, चुकूनही लपवली ही माहिती तर थेट कापणार पगार हेही वाचा- SBI ग्राहकांसाठी खूशखबर, आता डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही