JOIN US
मराठी बातम्या / मनी / Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

आता बळीराजाची चिंताच मिटली, हे एक काम केलं की सरकार देणार पिकाची नुकसान भरपाई

जाहिरात

पिक विमा योजना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बऱ्याचदा शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे फटका बसतो. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होतं. पिकासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं. त्यामुळे पिकांचंच नुकसान झालं तर शेतकरी कर्ज फेडणार कुठून हा प्रश्न असतो. मग अशावेळी पिकाचा विमा देखील उतरवला जातो. ज्यामुळे नुकसान झाल्यास सरकारकडून त्याची एक ठरावीक रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. पिकाची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना बराच काळ वाट पहावी लागते. दरम्यान, त्यांना सिंचन, तण व इतर कामांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात आणि पीक तयार असतानाही कापणी व वाहतुकीसाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामात पीक घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशातच जर वादळामुळे पिकाचे नुकसान झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा पडू शकतो. हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. पीक विमा योजनेत विमा मिळाला तर त्याचा लाभ घेता येईल. सध्या रब्बी पिकांचा विमा उतरविला जात असून 31 डिसेंबरपर्यंत या योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर लवकर ही नोंदणी करून घ्यावी अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

सरकारच्या 10 योजना शेतकऱ्याला मिळवून देतील मोठा फायदा

खरीप, रब्बी आणि व्यावसायिक किंवा बागायती पिकांचा प्रीमियम पाऊस, पूर, वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर त्याची माहिती 72 तासांच्या आत द्यावी लागते. टोल फ्री क्रमांक, ईमेल, कृषी कार्यालय आणि इतर माध्यमातून तुम्ही कृषी विभागाला ही माहिती देऊ शकता. खरीप, रब्बी आणि व्यावसायिक किंवा बागायती पिकांचा प्रीमियम 2, 1.5 आणि 5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभ? या योजनेअंतर्गत शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. सहकारी बँका किंवा किसान क्रेडिट कार्डकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऑटोमेटिक विमा मिळतो. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे सहकारी बँकांची कर्जे नाहीत, अशा शेतकऱ्यांनाही लाभ दिला जातो.

50,000 हजारात केळीची बाग फुलवा आणि मिळवा मोठा दुप्पट नफा

संबंधित बातम्या

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ कमी पाऊस झाल्यास, अथवा प्रतिकुल हवामान नसल्याने पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळतो अवकाळी पाऊस, महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान गोठ्यात किंवा शेतात ठेवलेल्या पिकावर चक्रीवादळ, चक्रीवादळ पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यांचा परिणाम झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या