मुंबई, 06 सप्टेंबर : पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) सारख्या छोट्या बचत योजनांचा व्याज दर कमी होऊ शकतो. बँकेला आपल्या डिपाॅझिटवर जास्त व्याज दर द्यावा लागतोच. सरकार या योजनांचे व्याज दर कमी करण्याचा विचार करतंय. या योजनांचा व्याज दर कमी करण्याचं कारण म्हणजे यांचे व्याज बाजाराशी जोडलेले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या रिटेल आणि एमएसएमई लोन रेपो रेटसारख्या एक्सर्टनल बेंचमार्कशी जोडण्याचे आदेश दिलेत. यामुळे येणाऱ्या तिमाहीत बँकेत एकूण व्याजाच्या मार्जिनवर दबाव येऊ शकतो. कारण बँक डिपाॅझिटवर व्याज दरांमध्ये जास्त कपात करू शकणार नाही. RBI नं उचललेल्या पावलांमुळे नवं कर्ज स्वस्त झालंय. काही बँकांनी रेपो रेटसोबत बँक डिपाॅझिट जोडलंय. SBI देतेय 1 तासात कर्ज, ‘असा’ करा अर्ज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, ‘हे’ आहेत तुमच्या शहरातले दर SBIचे एमडी पीके गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, व्याज दर कमी करताना डिपाॅझिटला रेपो रेटशी जोडणं योग्य नाही. एफडीचे ग्राहक छोट्या बचत योजनांकडे वळू शकतात. PPF, NSC चे व्याज दर कमी करण्याचा निर्णय राजकीय स्तरावर होईल. रेल्वेमध्ये सुरू आहे 252 जागांसाठी भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज एका सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा निर्णय घेणं सोपं नाही. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरून विरोधी पक्ष मोदींविरोधात आवाज उठवतायत. त्यामुळे छोट्या बचत योजनेबद्दल विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल.