मुंबई, 7 एप्रिल : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं अकाउंट (Account) तुम्ही उघडलं असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, अद्याप तुम्ही हे अकाउंट उघडलं नसेल, तर तुम्ही ते ताबडतोब सुरू करावं. कारण जेव्हा तुम्हाला पैशांची गरज भासेल तेव्हा तुमच्याकडे चांगला फंड (Fund) उपलब्ध असेल. हा फंड किती असेल, ते तुमच्या बचतीच्या (Saving) क्षमतेवर अवलंबून असेल; पण काहीही झालं तरी तो नक्कीच चांगला असेल. सेवानिवृत्ती पश्चात नियोजनासाठी (Retirement Planning) पीपीएफ हा बचतीचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये दर वर्षी गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीपर्यंत (Maturity) चांगली रक्कम जमा होऊ शकते. तुमची आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यातही हा फंड सहायक ठरू शकतो. सर्वच ठिकाणी करामध्ये सवलत `पीपीएफ`चे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, यामध्ये बचत केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80 C अंतर्गत करात सूट (Tax exemption) मिळते. तसंच यामुळे ईईई अर्थात एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्टचा (EEE) फायदाही मिळतो. याचा अर्थ तुम्ही यात बचत केलेल्या रकमेवर कर आकारला जात नाही. तुमच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही. शेवटी, मॅच्युरिटीवर मिळालेल्या एकूण रकमेवरही कर आकारला जात नाही. अशा प्रकारे यातून तीनवेळा करसवलतीचा लाभ मिळतो. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, ‘अशा’ प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा एका वर्षात किती रक्कम जमा करता येते? तुम्ही एका आर्थिक वर्षात पीपीएफ अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. तुम्ही बॅंकेत (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) पीपीएफ अकाउंट उघडू शकता. चांगली गोष्ट अशी आहे, की तुम्ही यात महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करू शकता. तुम्ही दरवर्षी आयकर रिटर्न भरताना पीपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर करसवलतीचा दावा करू शकता. यामुळे तुमचं करदायित्व कमी होतं. पीपीएफचा व्याजदर बॅंकेच्या सेव्हिंगपेक्षा आहे जास्त सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे. हा अन्य सरकारी गुंतवणूक योजनांच्या व्याजदरापेक्षा निश्चितच जास्त आहे. किसान विकास पत्रासह इतर योजनांचा परतावा यापेक्षा खूप कमी आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही पीपीएफ अकाउंट थोडी रक्कम जमा करून सुरू करू शकता. प्रत्येक आर्थिक वर्षात तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील, अशी अट यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला सलग 15 वर्षं पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर तुमचं अकाउंट मॅच्युअर होईल. खुशखबर! ‘या’ क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर अशा प्रकारे तुम्हाला मिळतील चांगले रिटर्न तुम्ही अद्याप पीपीएफ अकाउंट उघडलं नसेल तर ते उघडावं. महिन्याच्या एक ते चार तारखेदरम्यान अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करावा. एप्रिल महिन्यात 1 ते 4 तारखेपर्यंत अकाउंट उघडणं सर्वांत फायदेशीर आहे. परंतु, ही संधी आता संपली आहे. त्यामुळे आता पुढील महिन्याच्या 1 ते 4 तारखेपर्यंत अकाउंट उघडू शकता. 4 तारखेपूर्वी अकाउंट उघडण्याचं कारण म्हणजे यानंतर अकाउंट उघडल्यास व्याज पुढच्या महिन्यापासून मोजलं जातं. असं मोजलं जातं `पीपीएफ`वरचं व्याज पीपीएफमध्ये व्याज (Interest) मोजण्यासाठी एक विशेष पद्धत आहे. दर महिन्याच्या 5 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत (30 किंवा 31 तारखेपर्यंत) अकाउंटमधल्या किमान शिल्लक रकमेवर व्याज आकारलं जातं. 31 मार्चनंतर संपूर्ण आर्थिक वर्षाचं व्याज खातेदाराच्या अकाउंटमध्ये जमा होतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 ते 4 तारखेदरम्यान पीपीएफ अकाउंटमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळतं.