लोन
मुंबई : एक टक्के व्याजदराने कर्ज मिळतं हे वाचून तुम्हालाही दोन मिनिटं विश्वास बसणार नाही. पण तुम्हाला लोन घेता येऊ शकतं फक्त त्यासाठी तुमचं PPF खातं असायला हवं. सरकारी बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने टॅक्समध्येही सूट मिळते. कर्जाच्या बाबतीतही तो फायद्याचा सौदा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कर्ज घेतल्यावर खूप कमी व्याज द्यावं लागतं आणि तेही अगदी सहज उपलब्ध होतं. पीपीएफ खात्यातून काही पैसे ठरावीक कालावधीनंतर काढू शकता. पीपीएफ खात्यावर किती कर्ज उपलब्ध आहे आणि व्याज किती आहे, तसेच पीपीएफ खात्यावर कर्ज कसे घेता येईल? पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर खात्यात मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा केवळ १ टक्का अधिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज मिळत असेल तर पीपीएफ कर्जावर 8.1 टक्के व्याज द्यावं लागेल. पब्लिक प्रॉफिट फंड खात्यात जमा झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एकूण 25 टक्के गुंतवणूक कर्ज म्हणून काढता येते.
PPF Account : खातं मॅच्युअर होण्याआधीच बंद केलं दंड बसतो का?सरकारी बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीपीएफ) गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो, कारण यामुळे चांगले व्याजदर आणि करसवलत यासारखे फायदे मिळतात. पण कर्जाच्या बाबतीतही तो फायद्याचा सौदा आहे. कारण कर्ज घेतल्यावर खूप कमी व्याज द्यावं लागतं आणि तेही अगदी सहज उपलब्ध होतं. गेल्या आर्थिक वर्षात ३१ मार्च रोजी खाते शिल्लकीचे गणितही तपासण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही आर्थिक वर्षातून एकदाच कर्जासाठी अर्ज करता येतो. पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर खात्यात मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा केवळ १ टक्का अधिक आहे. म्हणजेच पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज मिळत असेल तर पीपीएफ कर्जावर 8.1 टक्के व्याज द्यावं लागेल. विशेष म्हणजे पर्सनल लोनपेक्षा स्वस्त आहे. वैयक्तिक गरजांसाठी नेहमीच कर्ज घेतले जाते. अशा परिस्थितीत बहुतांश लोक बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेतात. त्याचबरोबर वैयक्तिक कर्जावर बँका सर्वाधिक १०-१५ टक्के व्याज आकारतात. अशावेळी तुमच्याकडे पीएफ खातं असेल तर तुम्ही तिथून लोन घेऊ शकता. आपत्कालीन परिस्थितीतही ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण कर्ज घेताना जास्त व्याजाचा अतिरिक्त बोजा तुमच्यावर पडणार नाही.
Financial Tips : कर्जमुक्त होण्यासाठी ‘या’ पाच खास टिप्स, आर्थिक नियोजन करून व्हा टेन्शन फ्रीपीपीएफ खात्यावर घेतलेले कर्ज तुम्ही 36 महिन्यांत फेडू शकता, त्यामुळे जास्तीत जास्त 36 मासिक हप्ते करता येतील. त्याचबरोबर पहिली परतफेड केल्यानंतर पुढचे कर्ज मिळते. जर कर्जाची मूळ रक्कम 36 महिन्यांच्या आत परत केली गेली नाही तर व्याज दर 1% ऐवजी 6% असेल.
फॉर्म डीचा वापर पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्यासाठी केला जातो. या अर्जात कर्जाची रक्कम आणि त्याचा भरणा कालावधी द्यावा लागणार आहे. यासोबतच तुम्हाला पीपीएफ पासबुकही द्यावं लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर आठवड्याभरात कर्ज पास केले जाते.