Post Office scheme: ‘या’ तीन बचत योजना देतील जबरदस्त परतावा, पैसे बुडण्याची भीतीही नाही
मुंबई, 7 सप्टेंबर: अलीकडच्या काळात लोक गुंतवणूकीच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करत असतात. सध्या गुंतवणूकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, तरीही लोक पोस्टामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देतात. कारण ही गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन्स सेव्हिंग स्कीम (SCSS) ही परताव्याच्या बाबतीत काही स्मॉल सेविंग्ज बचतींमध्ये समाविष्ट आहे. ही गुंतवणूकीसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे. परतावा देण्याच्या बाबतीत सुकन्या समृद्धी योजनेनंतर ही दुसरी सर्वोत्तम योजना आहे. या योजनेचा मॅच्युरिटी काळ 5 वर्षे आहे आणि त्यावर वार्षिक 7.4 टक्के व्याज आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि त्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळेल. जास्तीत जास्त 15 लाख गुंतवू शकता- या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत फक्त 60 वर्षांवरील भारतीय नागरिकच खाते उघडू शकतात. ज्या लोकांनी VRS घेतले आहे ते वयाच्या 60 वर्षापूर्वी या योजनेत खाते उघडू शकतात. याशिवाय, या योजनेअंतर्गत व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह संयुक्त किंवा स्वतंत्र अशी एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतात. परंतु एकत्रित गुंतवणूक 15 लाखांपेक्षा जास्त नसावी. खातं उघडण्यासाठी किमान गुंतवणूक रक्कम 1000 रुपये आहे. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे पैसे रोखीने न देता ते धनादेशाने द्यावे लागतील. 15 लाखांना 20.55 लाख मिळतील-
हेही वाचा- लोन अॅपचा ट्रॅप! सुलभ कर्जाच्या दलदलीतून कसं बाहेर पडावं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन करेल कर्जमुक्त मुदतपूर्तीनंतर योजना वाढवता येते- या योजनेंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. परंतु मॅच्युरिटीनंतर ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. मुदतपूर्व बंद होण्यासाठी दंड आहे. गुंतवणुकीच्या एक वर्षानंतर परंतु 2 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, गुंतवणूकदाराला 1.5 टक्के शुल्क भरावं लागेल. 2 वर्षांनंतर परंतु 5 वर्षापूर्वी खाते बंद करण्यासाठी 1 टक्के दंड आहे; तर 1 वर्षापूर्वी खाते बंद केल्यावर व्याज मिळत नाही.