JOIN US
मराठी बातम्या / मनी / Post Office Schemes: पाच वर्ष गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, जास्त परतावा आणि सिक्युरिटीही

Post Office Schemes: पाच वर्ष गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, जास्त परतावा आणि सिक्युरिटीही

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी म्हणून ओळखली जाणारी गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट करू शकता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जुलै : तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक (Long Term Investment) करण्यास उत्सुक असाल, तर तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीसह पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीमुळे तुम्हाला केवळ चांगला परतावा मिळत नाही तर कर बचत होते. तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेचीही हमी देखील येथे दिली जाते. 5 वर्षांच्या मुदत ठेव खाते पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Post Office FD) म्हणून ओळखली जाणारी गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट करू शकता. पण सर्वाधिक व्याज 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिटमध्ये मिळेल. सध्या या योजनेत वार्षिक 6.7 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही हे खाते कमीत कमी 1000 रुपयांमध्ये उघडू शकता. 100 च्या पटीत तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. या 5 वर्षांच्या मुदत ठेव योजनेअंतर्गत प्राप्तिकर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. देशातील कोणत्या शहरात घर घेणे सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त, पाहा संपू्र्ण लिस्ट 5 वर्षे रेकरिंग डिपॉजिट (RD) पाच वर्षांसाठी गुंतवणुकीची विशेष योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉजिट (Post Office RD). इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, सध्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर 5.8 टक्के व्याज उपलब्ध आहे. हा नवा दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या आरडी स्कीममध्ये तुम्ही किमान 100 रुपयांचे खाते उघडू शकता. तुम्ही 10 च्या पटीत कोणतीही रक्कम जमा करू शकता. कमाल ठेव रकमेवर मर्यादा नाही. बाजारात आता Photo QR ची एन्ट्री! ही फक्त पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किमान पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. म्हणजेच पाच वर्षांच्या गुंतवणुकीनंतरच तुम्ही ते काढू शकाल. NSC मध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. NSC मध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेतील व्याजदर 6.8% आहे. या योजनेत तुम्ही किमान 1,000 रुपये गुंतवू शकता आणि तुम्ही 100 च्या पटीत पैसे गुंतवू शकता. गुंतवणुकीच्या रकमेवर मर्यादा नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या